सातारा: देशातील अग्रगण्य राष्ट्रीयीकृत बँकामधील एक प्रमुख बँक, बँक ऑफ महाराष्ट्र तर्फे गुरुवार दि.19 डिसेंबर रोजी रिटेलकर्ज मेळावा (रिटेललोन एक्सपो)बँकेच्या कृष्णानगर एमएसएमई शाखा सातारा येथे संपन्न झाला.
बँक ऑफ महाराष्ट्र ही सातारा जिल्ह्याची अग्रणी बँक असल्याने, बँकेने ग्राहकांना एकाच छताखाली विविध प्रकारच्या रिटेल कर्जाची माहिती मिऴावी या हेतूने हा मेऴावा आयोजित केला होता. या मेळाव्यात ग्राहकांना गृहकर्ज, वाहन कर्ज,देश विदेशात शिक्षण घेण्यासाठी कर्ज, पर्सनल कर्ज, मालमत्ता तारण कर्ज अशा विविध प्रकारच्याकर्जाची माहिती तसेच तत्वतः मंजूरीदेण्यात आली.
सदर मेळाव्याची सुरुवातश्रीमती. विद्युत वरखेड़कर, उपजिल्हाधिकारीसो, सातारा यांचे शुभहस्ते दिप प्रज्वलनाने झाली. यावेऴी बोलताना, त्यांनी बँक ऑफ महाराष्ट्रचे काम व ग्राहक सेवा याविषयी बँकेचे कौतुक केले व ग्राहकांनी बँकेच्या विविध योजनांचा लाभ घेण्याचे आव्हान केले.तसेच बँकेने अशीच उत्तरोत्तर प्रगति करावी अशा शुभेच्छा दिल्या.यावेऴी बँकेच्या सातारा जिल्ह्याचे अंचल प्रबंधक श्री वसंत गागरे यांनी बँकेच्या उपक्रमाविषयी माहिती दिली.
दिवसभर चाललेल्या या मेऴाव्यासग्राहकांनी मोठ्या प्रमाणात भेट दिली व बँकेच्या विविध कर्ज योजनांची माहिती घेतली. त्यापैकी बँकेच्यावतीने 18 ग्राहकांना रुपये 3 कोटी 52 लाख रुपयांचे कर्जमंजूर देखील करण्यात आले. सदर मेऴावा यशस्वी करण्यासाठी सुमित कुमार, ऋषिकेश गोडसेव बँकेच्या इतर अधिकार्यांचे सहकार्य लाभले.
गृहकर्ज आणि वाहन कर्जावरील प्रॉसेसिंग फी (प्रक्रिया शुल्क) दिनांक 31 डिसेंबर 2019 पर्यन्त आकारली जाणारनसल्यामुऴेया सुवर्णसंधीचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांनी नजिकच्या शाखेत संपर्क करण्याचे आव्हान बँकेने केले आहे.
बँक ऑफ महाराष्ट्रच्या रिटेल कर्ज मेऴाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद
RELATED ARTICLES

