सातारा: सातारा पालिकेच्या सभापती निवडीचा कार्यक्रम बुधवारी जिल्हा प्रशासनाने जाहीर केला. त्यानुसार शनिवार दि 4 जानेवारी रोजी छत्रपती शिवाजी सभागृहात दुपारी साडेबारा वाजता विशेष सभा बोलावण्यात आली
पीठासन अधिकारी म्हणून जिल्हा प्रशासन अधिकारी रविंद्र पवार हे काम पाहणार आहेत. या निवडीचा कार्यक्रम जाहीर झाल्याने सातारा विकास आघाडीच्या गोटात वेगाने राजकीय हालचाली सुरू झाल्या आहेत.
प्रांत मिनाज मुल्ला यांनी बुधवारी सभापती निवडीचा कार्यक्रम जाहीर केला. सकाळी 10ते 12 या वेळेत स्थायी व विषय समिती सदस्यपदासाठी अर्ज दाखल करणे, दु 12 ते 12.15 अर्ज छाननी, दुपारी 12.15 ते12.30 या दरम्यान विषय समिती सभापतीं पदासाठी अर्ज दाखल करणे, 12.30 वाजता पीठासन अधिकार्यांनी सभापती व स्थायी समितीच्या रचनेची घोषणा करायची आहे.
सभापती पदाच्या निवडी साठी बांधकाम सभापती पदी सविता फाळके, आरोग्य सभापतीपदी विशाल जाधव, नियोजन साठी ज्ञानेश्वर फरांदे, महिला व बाल कल्याण साठी सुनीता पवार यांना संधी मिळाली होती. श्रीकांत आंबेकर यांना मात्र मुदतवाढ देण्यात आली. मात्र खांदेपालट व्हावी हा प्रकर्षाने आग्रह सुरू आहे. उदयनराजे भोसले यांनी उपनगराध्यक्ष किशोर शिंदे यांना पुण्यात बैठकीसाठी पाचारण केले होते. यदु नारकर, लता पवार, अण्णा लेवे, अनिता घोरपडे यांची नावे पुन्हा चर्चेत आहेत. आता मनोमिलनाचे म्होरकेच भाजपात गेल्याने सातारा पालिका भाजपच्या झोळीत गेली आहे. मात्र पालिकेत सातारा विकास आघाडी, नगर विकास आघाडी व भाजप आघाडी अशा तीन स्वतंत्र गटाचे अस्तित्व कायम आहे. सभापती पदासाठी साविआचेच मोहरे की आमदार गट किंवा भाजपच्या नगरसेवकांना संधी मिळणार याचा निर्णय उदयनराजे भोसले घेणार आहेत.
सातारा पालिकेच्या 4 जानेवारी रोजी होणार्या सभापती निवडीत उदयनराजे कोणाला संधी देणार?
RELATED ARTICLES