Friday, April 25, 2025
Homeठळक घडामोडीग्रामपंचायत निवडणूक दि.23 ते 25 मार्च पर्यंत अनुज्ञप्ती बंद

ग्रामपंचायत निवडणूक दि.23 ते 25 मार्च पर्यंत अनुज्ञप्ती बंद

सातारा : सातारा जिल्ह्यातील 44 सार्वत्रिक ग्रामपंचायतीच्या निवडणूकांसाठी मतदान दि. 24 मार्च व मतमोजणी दि. 25 मार्च 2019 रोजी होत आहे. या काळात सातारा जिल्ह्यातील शांतता व सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी मुंबई विदेशी मद्य (रोखीने विक्री) नियमावली 1969 चा नियम क्रं.9 (क) महाराष्ट देशी दारु नियमावली 1973 मधील नियम क्रं 26 (क) महाराष्ट ताडी दुकाने (अनुज्ञप्ती ) आणि ताडी झाडे (छेदणे) नियम 1968 मधील नियम क्रं 5 (अ) अन्वये जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी सातारा जिल्ह्यातील ज्या ग्रामपंचायतीमध्ये सार्वत्रिक निवडणूका आहेत अशा सर्व ग्रामपंचायतीच्या क्षेत्रातील सर्व देशी दारु विक्री, विदेशी मद्य विक्री परमिट रुम / बिअर बार, बिअर शॉपी, (सीएल-2, सीएल -3 फॉर्म -इ.एफएलबिआर-2 इ.) अनुज्ञप्तीच्या जागा व विक्री परवाने पुढील प्रमाणे तीन दिवस बंद राहतील.
दि.23 मार्च रोजी मतदानाचा अगोदरचा दिवस संपुर्ण दिवस, दि.24 मार्च रोजी मतदानाचा दिवस संपुर्ण दिवस व दि.25 मार्च रोजी मतमोजणीचा दिवस सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत अनुज्ञप्तीच्या जागा व विक्री परवाने बंद या आदेशाची अंमलबजावणी काटेकोरपणे करावयाची असून त्यात कसूर झाल्यास संबंधित अनुज्ञप्तीधारकांच्या विरुध्द कडक कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular