Wednesday, June 25, 2025
Homeठळक घडामोडीडॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन इमारतीचा गुरूवारी लोकार्पण सोहळा

डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन इमारतीचा गुरूवारी लोकार्पण सोहळा

सातारा : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत सातारा जिल्ह्यात बांधण्यात आलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, सातारा, मुलींचे शासकीय वसतिगृह, शिरवळ, मुलींचे शासकीय वसतिगृह, दहिवडी, अनुसुचित जाती शासकीय निवासी शाळा, म्हसवड या इमारतींचे उद्घाटन समारंभ दि. 14 फेब्रुवारी 2019 रोजी सकाळी 10 वा. बॉम्बे रेस्टॉरेंट उड्डानपुलाजवळ, जुनी एम.आय.डी.सी. रोड, सातारा येथे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते होणार आहे, अशी माहिती सहाय्यक आयुक्त्, समाज कल्याण सचिन कवले यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
सदरचा कार्यक्रम सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते, महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली, पालकमंत्री विजय शिवतारे, कृषी राज्यमंत्री तथा सातारा जिल्हा सहपालकमंत्री सदाभाऊ खोत, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य राज्यमंत्री दिलीप कांबळे, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे, जिल्हाधिकारी श्वेता सिंघल, समाजकल्याण आयुक्त मिलिंद शंभरकर, पोलिस अधिक्षक पंकज देशमुख, प्रादेशिक उपायुक्त्ा अविनाश देवसटवार तसेच इतर मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडणार आहे.
दि. 14 फेब्रुवारी 2019 रोजी सकाळी 10 वा. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 125 व्या जयंती वर्षानिमित्त नविन मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह, शिरवळ येथे उद्घाटन, दुपारी 12 वा. डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, सातारा येथील इमारतीचा लोकार्पण सोहळा, सायंकाळी 4 वा. दहिवडी, ता. माण येथील मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृहाचे लोकार्पण सोहळा, सायंकाळी 5 वा. म्हसवड, ता.माण येथील अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील मुलांची शासकीय निवासी शाळाचे लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे.
सातार्‍यात दि. 14 फेब्रुवारी रोजी उद्घाटन होणार्‍या सामाजिक न्याय भवन मध्ये अफ भागात सामाजिक न्याय विभाग कार्यालय आणि जात पडताळणी कार्यालय तर ब भागात संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ मर्यादित, महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्यादित, महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ मर्यादित, वसंतराव नाईक विमुक्त् जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ मर्यादित, साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे विकास महामंडळ मर्यादित, अपंग व वित्त विकास महामंडळ ही सहा कार्यालये या इमारतीत असतील, अशी माहिती सहाय्यक आयुक्त्, सचिन कवले यांनी आज पत्रकार परिषेदेत दिली आहे.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular