सातारा : सातारा लोकसभा मतदार संघाचे पक्षाचे अधिकृत उमेदवार खा.श्री. छ. उदयनराजे भोसले यांच्या प्रचार नियोजन बैठक बुधवार दि. 20 मार्च रोजी सकाळी 11 वाजता राष्ट्रवादी भवन सातारा येथे ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर पक्षाचे जिल्हा प्रभारी आ. शशिकांत शिंदे, लोकसभेचे उमेदवार खा. श्री. छ. उदयनराजे भोसले व पक्षाचे माजी आमदार विक्रमसिंह पाटणकर, आ. बाळासाहेब पाटील, आ. श्री. छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, आ. मकरंद पाटील, मा.आ.दिपक चव्हाण, माजी आमदार प्रभाकर घार्गे यांच्या प्रमुख उपस्थितीत होत आहे.
तरी सदर बैठकीस पक्षाचे आजी, माजी जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य, आजी, माजी नगरसेवक, सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांचे पदाधिकारी, फ्रंटल सेलचे पदाधिकारी, तालुकाध्यक्ष, लोकसभा मतदार संघ अध्यक्ष, जिल्हा कार्यकारणी सदस्य, प्रदेश प्रतिनिधी तसेच पक्षाचे कार्यकर्ते यांनी उपस्थित रहावे असे आवाहन जिल्हाध्यक्ष सुनिल माने यांनी केले आहे.
उदयनराजेंच्या प्रचार नियोजनासाठी ना. रामराजेंसह आमदारांची बैठक
RELATED ARTICLES

