सातारा तालुक्यातील 4 ग्रामपंचायतीचा निकाल जाहीर
सातारा : सातारा तालुक्यातील लिंब, टिटवेवाडी, देशमुख नगर आणि लिंब या चार चार ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा निकाल आज जाहीर करण्यात आला. संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून राहिलेल्या लिंब ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी अनिल सुरेश सोनवणे हे विजयी झाले. बोपोशी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाचा निकालही जाहीर करण्यात आला. श्रीकांत नारायणराव राजेशिर्के यांची सरपंचपदी वर्णी लागली आहे. निकाल जाहीर होताच संबंधित ग्रामपंचायतीच्या विजयी उमेदवारांनी गुलालाची उधळण करत आनंद व्यक्त केला.
लिंबू ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी अनिल सुरेश सोनवणे यांना 3322 मते पडली. त्यांना विजयी घोषित करण्यात आले. सदस्य पदासाठी दादा तात्याबा बरकडे (897), मानसिंग मुकुंद सावंत (880), रामदास नामदेव सोनमळे (655), रेश्मा प्रकाश निकम (681), वंदना दत्तात्रय सावंत (643), महेश बाळकृष्ण पाटील (680), सुनील अशोक करंजे (675), अनिता विष्णू जाधव (602), सुबोध गणपत भोसले (490), उज्वला सुधीर शिंदे (527), तुळसाबाई रंगराव सरगर (465), घनश्याम मारुती सावंत (454), राहुल दत्तात्रय सावंत (419), सुमन रमेश सोनमळे (427), रविंद्र शंकर शिंदे (500), आशा विजय धुमाळ (586), विमल दिलीप सावंत ( 498).
टिटवेवाडीच्या सरपंच पदासाठी शीला राजाराम सावंत या विजयी झाल्या. त्यांना 365 मते मिळाली. सदस्य पदासाठी बिरदेव वार्ड नंबर 1 मधून संजीवनी दिलीप भोसले (95), ज्योतिर्लिंग वॉर्ड नंबर 2 मधून किरण महादेव पवार (102), मिराबाई शंकर माने (101) हनुमान वार्ड क्रमांक 3 मधून राजकुमार माणिक चव्हाण (165) हे विजयी झाले.
देशमुखनगरच्या सरपंच पदासाठी संपत कृष्णा देशमुख हे विजयी झाले. त्यांना 126 मते मिळाली. सदस्य पदासाठी हनुमान वार्ड क्रमांक 1 मधुन सोपान दिनकर देशमुख (41), इंदुबाई बजरंग देशमुख (35), दत्त वार्ड क्रमांक 2 मधून सुनिता रमेश देशमुख (66), कमल पांडुरंग देशमुख (63), ज्योतिर्लिंग वार्ड क्रमांक 3 मधून हिरालाल यदु देशमुख (59) मते मिळवून विजयी झाले.
पानमळे ग्रामपंचायतीच्या सदस्यपदासाठी प्रभाग क्रमांक 1 मधून आशा प्रकाश चव्हाण (246), संगीता जितेंद्र नलवडे (191) प्रभाग क्रमांक 2 मधून दत्तात्रय शिवराम चव्हाण (192), सुभाष विठ्ठल चव्हाण (159) वैशाली विकास चव्हाण (204) सुनिता जनार्दन शिंदे (157) प्रियंका अनिल चव्हाण (186) लता तानाजी शिंदे (152) प्रभाग क्रमांक 3 मधून पुनम अमोल गोरे (371), माधुरी प्रकाश गोळे (210) हे उमेदवार विजयी झाले.
लिंबच्या सरपंचपदी अनिल सोनमळे विजयी
RELATED ARTICLES