गोडोली येथे सलग 19 व्या वर्षी रक्तदान शिबिर
सातारा : रक्तदान हे एकमेव असे दान आहे जे कोणाला दान केले आहे, हे समजत नाही. रक्तदात्यांमुळे हॉस्पिटलमध्ये मृत्यूशी झुंज देणार्या असंख्य रुग्णांचे प्राण वाचत असतात. गोडोली येथील रवी पवार या युवकाने गेले 19 वर्ष अखंडतीपणे रक्तदानाचा उपक्रम सुरु ठेवला आहे. स्वत: दरवर्षी रक्तदान करुन इतरांनाही रक्तदान करण्याची प्रेरणा देण्याचे काम रवी पवार आडि गोडोलीकर करत आहेत. एक दिवस त्यांच्या या उपक्रमाचे वर्ल्ड रेकॉर्ड होईल, असे गौरवोद्गार कर्तव्य सोशल ग्रुपच्या संस्थापिका श्रीमंत छ. सौ. वेदांतिकाराजे भोसले यांनी काढले.
गोडोली येथील राजमाता जिजाऊ सभागृह येथे आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या वाढदिवसानिमीत्त कर्तव्य सोशल ग्रुप, युव मोरया सामाजिक संस्था आणि गोडोली मित्रसमुह यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराच्या उदघाटनप्रसंगी सौ. वेदांतिकाराजे बोलत होत्या. यावेळी जिल्हा परिषदेच्या समस्या सौ. मधु कांबळे, नगरसेविका सौ. मनिषा काळोखे, नगरसेवक शेखर मोरे- पाटील, पंचायत समितीच्या माजी सदस्या सौ. वनिता कण्हेरकर, विलासपूरचे उपसरपंच अभय जगताप, जेष्ठ नेते व्यंकटराव मोरे, मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक शरद काटकर, पोपटराव मोरे, राजू मोरे, अमित जगताप, अंबवले गुरुजी, सिध्दार्थ सालीम, मालती साळुंखे, उषा जाधव, किर्वे, पांडूरंग पोतेकर आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
शिबीरात दरवर्षीप्रमाणे सौ. वेदांतिकाराजे यांनीही रक्तदान केले. यावेळी एकूण 32 रक्तदात्यांनी रक्तदान केले. रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. रक्तदान केल्याने कोणाचेतरी प्राण वाचतील हा उदात्त हेतू रक्तदान करणार्यांच्या मनात असतो. आज हॉस्पिटलमध्ये असंख्य रुग्णांना दररोज रक्ताची गरज भासत असते. के रक्त कोणत्याही मशिनवर तयार होत नाही तर, ते रक्तदान केल्यानेच उपलब्ध होत असते. त्यामुळे रक्तदान हे ङ्गार मोठे पुण्याचे काम असून गोडोलीकर आणि खास करुन रवी पवार सारखे युवक गेल्या 19 वर्षांपासून रक्तदान करत आहेत, हे कौतुकास्पद आणि प्रेरणादायी आहे. हा आदर्श सर्वांनी घेवून एक सामाजिक बांधिलकी म्हणून वर्षातून किमान एकदा तरी रक्तदान करावे, असे आवाहन सौ. वेदांतिकाराजे यांनी यावेळी केले.
शिबिर यशस्वी करण्यासाठी रवी पवार, युवराज जाधव, विजय काळोखे, दत्तात्रय चव्हाण, गणेश निकम, विक्रांत देशमुख, सागर भोसले, कर्तव्य सोशल ग्रुपचे विजय देशमुख, विलास कासार, दिपक भोसले, राजा महाडिक, सुनिल भोसले आदींनी परिश्रम घेतले.
गोडोलीकर रक्तदान शिबिराचे वर्ल्ड रेकॉर्ड करतील :सौ. वेदांतिकाराजे
RELATED ARTICLES