Tuesday, June 24, 2025
Homeठळक घडामोडीकिशोरभाउंचे जीवन हीच एक चळवळ

किशोरभाउंचे जीवन हीच एक चळवळ

सातारा: हे विश्वची माझे घर या तत्वाने चालणार्‍या किशोरभाउंचे जीवन हेच एक चळवळ होती, धाकट्या भावासारखा तपासे कुटुंबियांच्या पाठीशी मी सदैव असेन अशा शब्दात खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी किशोर तपासे यांना आदरांजली वाहिली.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आठवले गट) महाराष्ट्र उपाध्यक्ष किशोर तपासे यांना आदरांजली वाहण्यासाठी आयोजित केलेल्या शोकसभेत ते बोलत होते. ही सभा सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात झाली. केंदीय मंत्री रामदास आठवले, महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळाचे अध्यक्ष राजाभाऊ सरोदे, अविनाश म्हातेकर, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड, हणमंतराव साठे, शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख नरेंद्र पाटील, मातंग आघाडीचे आण्णा वायदंडे आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
खा. श्री. छ. उदयनराजे भोसले म्हणाले, किशोरभाऊंनी पहिल्यापासून चळवळीत काम केले. तळागाळातील लोकांबद्दल त्यांना जिव्हाळा होता. त्यांच्या या गुणांमुळेच मी त्यांच्याशी जोडला गेलो, नगरसेवक, आमदार, मंत्री, खासदार या माझ्या राजकीय व सामाजिक प्रवासात मला अनेकांनी मार्गदर्शन केले. किशोरभाऊ हे त्यापैकी एक प्रमुख व्यक्तिमत्व होते, हे सांगतांना मला अभिमान वाटतो. माणसे जन्माला येतात आणि या जगातून निघूनही जातात, परंतु केलेल्या कार्यामुळेच त्यातील काहींचे नाव घेतले जाते.
किशोरभाऊ तपासे यांचा लहान भाऊ म्हणून मी तपासे कुटुंबियांची जबाबदारी घेत आहे. किशोरभाऊंची आठवण व पोकळी कायम राहील, अशा शब्दात श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular