(अल्पेश लोटेकर)
परळी: बहुचर्चित नाळ चित्रपटातील लहानग्या चैतू हा आईकडे पोहायला जाताना, आई… मला नदीमध्ये पवायला जायचंय…जाऊ दे न व… असे म्हणत हट्ट करतो, असाच हट्ट परळी खोर्यातील युवक आपल्या आई-वडिलांकडे पोहायला जाण्यासाठी करीत आहेत.
दिवसेंदिवस तापमानात प्रचंड प्रमाणात वाढ होत आहे. त्यामुळे दुपारच्या वेळी घराबाहेर पडणे मुश्कील होत आहे. त्यातच सध्या सर्वत्र सकाळच्या सत्रात शाळा सुरू असून, दुपारच्या सत्रात अनेक शाळकरी मुले थंडावा मिळविण्यासाठी
नदीपात्रामध्ये पोहायला जाताना दिसत आहेत. पोहायला शिकण्याबरोबर थंडाळ्याचा आनंद घेण्याचा उद्देश असला तरी, एखादा अपघात होण्याची शक्यताही निर्माण होत आहे. त्यामुळे दक्षता घेण्याची गरज आहे. या वर्षांचा उन्हाळा नागरिकांना असा झाला आहे. सातारा शहराच्या पश्चिम भागातील परळी खोर्यात उष्णतेच्या झळा मोठ्या प्रमाणात जाणवू लागल्या आहेत. त्यामुळे दुपारच्या वेळी बालचमुनीं आपला मोर्चा अंघोळीसाठी नदी, धरण, विहीर अथवा जवळ असेल तर कालव्याकडे वळविला आहे. त्यामुळे सध्या विहिरी व नदीवर बालकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे. त्यातून एखादा अपघात होण्याचीही शक्यता बळावत असल्याने पालकांनी काळजी घेण्याची गरज आहे. परळी खोरे हे नैसर्गिकदृष्ट्या संपन्न आहे. सर्वत्र हिरवळ असूनही सध्या तापमानात प्रचंड वाढ होत आहे. यामुळे प्रचंड उष्मा जाणवत आहे.
सकाळच्या सत्रात शाळा, कॉलेज सुरू असल्याने दुपारच्या वेळी ही मुळे अंघोळीसाठी उरमोडी धरण, गजवडी केटी बंधारा, शिवारातील विहिरीवर मोठी गर्दी करीत आहेत.
विहिरीत युवक दुपारच्या डुबक्या मारीत आहेत. हा आनंद घेण्यासाठी विहिरीकडे तसेच बंधारा, उरमोडी धरणात धाव घेण्यासाठी युवक आपल्या आई-वडिलांकडे दुचाकीचा हट्ट धरताना दिसत आहेत. त्यामुळे
बहुचर्चित नाळ चित्रपटातील लहानग्या चैतू हा आपल्या आईला, आई, मला नदीमध्ये खेळायला व पवायला जायचंय…जाऊ दे न व… हे म्हणत पोहण्यासाठी धरलेल्या हट्टाची आठवण आल्याशिवाय राहात नाही.
परळी खोर्यात नदीपात्र गजबली, दक्षता घेण्याची गरज
RELATED ARTICLES

