Thursday, June 19, 2025
Homeठळक घडामोडीघंटागाड्यांच्या बंदमुळे शहरात जागोजागी कचर्‍याचे ढीग

घंटागाड्यांच्या बंदमुळे शहरात जागोजागी कचर्‍याचे ढीग

सातारा : सातार्‍यात गेल्या आठ दिवसापासून तब्बल शंभर टनाहून अधिक कचरा रस्त्यावर पडून राहिल्याने सातार्‍याची कचरा कुंडी झाली आहे. कचर्‍याची विल्हेवाट न लागल्यास कचरा पालिकेत आणून ओतला जाईल असा इशारा नागरिकांनी दिल्याने यंत्रणा हडबडली आहे. पोवई नाका ते सदर बझार व पोवई नाका ते मोरे कॉलनी शहराच्या दोन टोकांसाठी तब्बल वीस घंटागाड्या व चार ट्रॅक्टरची सोय असताना फेर्‍यांचे गणित जुळेनासे झाल आहे. ऐक्य कॉर्नर, प्रताप सिंह शेती फार्म परिसर, अंजली कॉलनी, रामाचा गोट व मंगळवार पेठेच्या हद्दीवरील गवंडी आळी, सदाशिव पेठ भाजी मंडई, बसाप्पा पेठ, तसेच केसरकर पेठ, सर्वोदय कॉलनी इ. भागामध्ये प्रचंड कचरा पडून राहिल्याने त्या परिसराला बकाल स्वरूप आले आहे. मोरे कॉलनीत नागरिकांनी चक्क स्वाक्षर्‍याची मोहिम घेतली तर केसरकर पेठेत पाण्यावरून कधी नव्हे तर कचरा कोंडी झाल्याने संतप्त महिलांनी मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे. शिवसेना सुद्धा सातार्‍यात कचर्‍यावरून प्रचंड आक्रमक झाली आहे. शहराध्यक्ष बाळासाहेब शिंदे यांनी मुख्याधिकारी शंकरराव गोरे यांना घेराव घालण्याचा इशारा दिला आहे.
घंटागाडी चालकांचा सातार्‍यात घंटानाद
साशाकडून फसविले गेल्याची भावना झाल्या बेमुदत संप केलेल्या घंटागाडी चालकांनी गुरुवारी चकक दिवसभर घंटानाद आंदोलन केले. प्रत्येक कार्यकर्त्याने चक्क एक तास घंटा वाजवली. चंद्रकांत खंडाईत व गणेश भिसे या कामगार नेत्यांच्या नेतृत्वाखाली चाळीस घंटागाडी चालकांनी साशा कंपनीचे ऑडिट व थकित तेरा महिन्याचे वेतन असे निवेदन विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर यांना दिले. आयुक्तांनी घंटागाडी चालकांशी चर्चा करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांना बैठकीनंतर केल्या. सकारात्मक तोडगा न निघाल्यास नव्या घंटागाडी चालकांना काम करू दिले जाणार नाही असा इशारा देण्यात आला आहे.
नवीन कायझेन घंटागाडयांचा प्रस्ताव
मोठा हौदा तसेच ओला व सुका कचरा विलग करणार्‍या कचरा 6ेण्याची सोय असणार्‍या कायझेन घंटागाडयांची मागणी सातारा पालिकेने ऑनलाईन नोंदवली आहे . मात्र प्रात्यक्षिक व व्यावहारिकता तपासल्याशिवाय कोणतीही खरेदी ऑनलाईन पोर्टलवर होणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले. पहिल्या टप्प्यात वीस घंटागाड्याच्या खरेदीसाठी नव्या ठेकेदाराचा पुन्हा शोध घेतला जात आहे. ओला कचरा हिरव्या तर सुका कचरा लाल ट्बमध्ये टाकायचा आहे . दोन्ही टब कार्गोला फिक्स राहणार असून या गाडयांनाही बारा फेर्‍यांचे टार्गेट दिले जाण्यची शकयता आहे. जपानी कायझेनची किंमत पोर्टलला साडेपाच लाखाच्या आसपास असून कस्टमाईज्ड सेवेमुळे अद्याप कोणतीही स्थानिक स्वराज्य संस्था कायझेन ला संलग्न झाली नाही.
आकडे काय सांगतात
1) शहराचा रोजचा कचरा -44 टन 2) यंत्रणा – वीस घंटागाडी , सहा ट्रॅक्टर, दोन टीपर 3) कायझन चा खर्च – 1 कोटी 20 लाख 4) घंटागाडीचे नवे टेंडर सोलापूर व सातार्‍यात विभागून 5) साशाशी झालेला स्वच्छता करार- 2 कोटी 83 लाख 6) प्रत्यक्षात घंटागाडी चालकांना अदा झढलेल वेतनं-1 कोटी 10 लाख – 7) पावणेदोन लाखाचा ढेकर कोणाचा?.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular