Thursday, April 24, 2025
Homeकरमणूकसातार्‍याच्या मातीत घडतोय सनकी..!

सातार्‍याच्या मातीत घडतोय सनकी..!

:सातार्‍याच्या युवा दिग्दर्शक राज पुजारीची कलाकृती…!

सातारा : चित्रपट क्षेत्राचे आकर्षण सर्वानाच असते,मात्र यात सर्वांनाच यश मिळतेच असे नाही. ही एक ग्ल्यामर दुनिया आहे. या दुनियेत खूप मेहनत केल्यावरच यश मिळते.ते यश मिळवन्यासाठी वेडे व्हावे लागते. खूप सारा संयम आणि मेहनत लागतो. असाच सातार्‍यातील एक युवक त्याच्या समवयस्क साथीदारांसोबत सातार्‍याच्या मातीत सनकी या मराठी चित्रपटाची निर्मिती करत आहे. या तरुण दिग्दर्शकाचे नाव आहे मराज पुजारी. या चित्रपटाच्या नावाची चर्चा पहिल्यापासूनच आहे.


त्यासाठी राज आणि त्याचे साथीदार जी मेहनत घेत आहेत ते त्यांच्या प्रोमो पाहून कळते. ते खरंच कौतुकास्पद आहे. जेमतेम मध्यमवर्गीय कुटुंबातील राज पुजारी हा इंजिनिअरिंग क्षेत्राचा विद्यार्थी असून त्याने दहावी बारावी चे शिक्षण पुण्यातून घेतले. सातार्‍यातील गौरीशंकर नॉलेज सिटी मधून डिप्लोमा केला. पुण्यातील प्रसिद्ध एम.आय.टी कोथरूड येथे डिग्रीचे शिक्षण घेत असताना त्याच्या वडिलांचे निधन झाले.त्यावेळी मग सातारा-पुणे वारी सुरू झाली.राजची शैक्षिणक वाटचाल ही नेहमीच हुशार व वर्गातील, कॉलेजमधील टॉपर अशी राहिलेली आहे.युपीएसची तयारी करणारा राज
शिक्षकांचा नेहमीचीच आवडता विद्यार्थी राहिला.राज कोणतीही गोष्ट करताना संयम आणि सातत्य या गोष्टीना फार किंमत देतो.डिग्रीनंतर यु.पी.एस.सी करून सरकारी अधिकारी होण्याचं स्वप्न मनाशी बाळगून राजने त्याचा अभ्यासही सुरु केला होता . इंजिनियरिंग करून एक कंपनीमध्ये नोकरी करत असताना चार भिंतीत अडकून न राहता काहीतरी वेगळे करण्याचा विचार मनात घेऊन राजने कलाक्षेत्राकडे वळण्याचा निर्णय घेतला. दोन वर्षांपूर्वी त्याने चित्रपट या क्षेत्रात पाऊल ठेवले. तेही कोणत्याही प्रकारचे आर्थिक पाठबळ नसताना…! तेव्हापासून त्याला खूप सारे चांगले मित्र आणि अनुभवी लोकांची साथ मिळत गेली. तथापि सदर चित्रपट करत असताना त्याला खूप सारे वाईट अनुभव, फसवणूक अशा गोष्टीना तोंड द्यावे लागत होते. सातार्‍यातील काही हुशार आणि प्रामाणिक मित्रांची साथ त्याला लाभली. त्यामध्ये रुपेश मोरे या त्याच्या जिवाभाच्या मित्राची लाख मोलाची मदत लाभत आहे.


सनकीचा प्रोमो पाहील्यावर कोणी म्हणणार नाही कि हा राज पुजारीचा दिग्दर्शक म्हणून पहिलाच चित्रपट आहे. अनुभव घेण्यासाठी राजने काही दिवस पुण्यातील एफ.टी.आय मधील काही मित्राचा सल्ला व मार्गदर्शन घेतले, सातारा,पुणेमध्ये चित्रीकरण होणार्‍या चित्रपटांच्या सेटवरती जाऊन कामाची माहिती घेतली. त्यासोबतच कलाकार आणि अनुभवी फिल्ममेकर्ससोबत चर्चा आणि मार्गदर्शन घेतले. चित्रपट सोबतच नाटक हे राजचे आवडते क्षेत्र. या क्षेत्रातील काही अनुभवी कलाकारांनी राजला मोलाची साथ दिली. अनुभ आणि शिकण्यासाठी मोफत असलेला राजचा अजून एक साथीदार म्हणजे इंटरनेट..! राजने इंटरनेटचा पुरेपूर वापर करत नवीन गोष्टी शिकल्या व शीत आहे. मसनकीफ ची निर्मिती करत असताना अथवा कोणत्याही चित्रपटाची निर्मिती करताना आर्थिक पाठबळ असणे फार गरजेचे असते. अशावेळी साथ देणारे फारच मोजके असतात व सल्ले देणारे आणि नकारात्मक चर्चा करणारे हजारो भेटतात. राजलाही या समस्यांना सामोरे जावे लागत होते व आजही तो अशा समस्यांना तोंड देत आहे.असले तरी कोणतेही पाऊल उचलताना आपण संपूर्ण माहिती घेऊन आणि मगच त्याविषयी निर्णय घेऊन सुरुवात करणे हेच राजला योग्य वाटते. सांगण्यासारखे खूप सारे अनुभव गाठीशी असताना ते सांगणे राजने टाळले आणि आपल्या कामावर फॉकस ठेवायचा असे तो स्पष्ट करतो.
राजने सुरुवातीला पाच सहकार्‍यांच्यासोबत शॉक एंटरटेन्मेन्ट या निर्मितीसंस्थेची स्थापना केली. आणि नंतर स्वतःच्या मालकीच्या शॉक स्टुडिओज सातारा या निर्मितीसंस्थेची स्थापना केली. सनकी चित्रपटाची निर्मिती शॉक स्टुडिओज (राज पुजारी/ रुपेश मोरे) करत असून कथा ही राज पुजारीने स्वतः लिहिलेली असून त्याचे कथा, पटकथा, संवाद, दिग्दर्शन व अन्य जबाबदार्‍या राजच सांभाळत.
या चित्रपटाचे चित्रीकरण आपल्या सातार्‍यातील सुंदर आणि नावाजलेल्या ठिकाणे होत असून त्याला सातारकरांची साथही भेटत आहे.चित्रपटाचे संगीत दर्शन-प्रसाद-नितीन हे देत असून त्याचे संकलन आपल्या सातार्‍यातील निखिल गांधी हे पाहत आहेत. कॅमेरामन म्हणून मूळचा चेन्नईचा असलेल्याला एम. रविक्रीष्णा काम पाहात आहेत, सनकीचे सुंदर पोस्टर हे विनायक गोरे डिझायनर तयार करत आहेत.सनकीच्या टीममध्ये राजला सातार्‍यातील, पुण्यातील आकाश कदम, आदित्य सोनमळे,जयेश पटेल, तेजस सुपेकर, आदित्य निकम, इंद्रजीत सोनावणे, रोहित गायकवाड, प्रज्योत पवार, बाबा ढाकणे, रुपेश मोरे,आकाश गिरी, हर्षद पटेल यांची साथ लाभत आहे. हे सर्व नवीन व हुशार तसेच समवयस्क असल्याने त्यांच्या बॉण्डिंग छान जमले आहे.चित्रपट निर्मिती करताना अथवा कोणताही व्यवसाय करताना आर्थिक बाजू पाहूनच पाऊल टाकावे लागते.
चित्रपटाची कथा ही खूप सार्‍या सामाजिक विषयावर तसेच इंजिनिअरिंगच्या विद्यार्थी व स्पर्धा परीक्षेची विध्यार्थी यांच्यावर भाष्य करणारी आहे. त्यातून समाजमन जागृत करणे हा हेतूही आहे. स्त्रीचा आदर करणारा संदेश यातून देण्यात आला आहे. असे असले तरी राजने व्यावसायिक दृष्टीकोन ठेवत हा चित्रपट कमर्शियल प्रकारे साकारत आहे. नुकतेच सनकीच्या पोस्टरचे प्रसिद्ध अभिनेते आमिर खान यांच्या हस्ते झाले. चित्रपटातील कलाकार कोण आहेत हे मात्र राजने उघड केलेले नाही.
व्यवसाय म्हटले कि त्यात चढ-उतार आलेच. सनकीचा हा प्रवास आपल्या सातार्‍यातून सुरु आहे व तो यशस्वी प्रवास होईल असा राजला विश्वास आहे. तरीही या नवीन युवा तरुणांना सातारकरांचे, सातार्‍यातील कलाकारांचे सहकार्य मिळावे आणि हा चित्रपट लवकरच मोठ्या पडद्यावर यावा यासाठी सनकी टीमला सहकार्य करावे असे आवाहन राज पुजारी याने केले आले.
आजवर सातार्‍यातील अनेक कलाकार, दिग्दर्शक, निर्माते यांनी आपल्या मेहनतीने आणि नाविन्यपूर्ण कलाककृतीने सातार्‍याचे चित्रपट क्षेत्रात नाव-लौकिक केले आहे. त्यांचा अनुभव, त्यांचे मार्गदर्शन आणि आशीर्वाद सोबत घेऊन त्यांच्याप्रमाणेच एक चांगली कलाकृती घडवण्यासाठी राज पुजारी व त्याचे सहकारी प्रयत्न करत आहे. सातार्‍यातील तरुणांनी व हातभार लावू शकणार्या सर्वच क्षेत्रातील मान्यवरांनी सातारच्या या होतकरू तरुणांना सहकार्य करावे असे आवाहन करण्यात येत आहे.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular