Wednesday, December 3, 2025
Homeठळक घडामोडीकर्नल आर. डी. निकम यांच्या जयंतीनिमित्त आयोजित रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

कर्नल आर. डी. निकम यांच्या जयंतीनिमित्त आयोजित रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

सातारा : (एकनाथ थोरात) महाराष्ट्र माजी सैनिक व पेन्शनर्स संघटना व कर्नल आर. डी. निकम सैनिक सहकारी बँक लि. यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्रातील आजी-माजी सैनिक व सैनिक महिलांचे प्रेरणास्थान कर्नल आर. डी. निकम तथा दादा यांच्या 98 व्या जयंतीदिनाचे औचित्य साधून 10 जून रोजीरोजी भारत स्काऊट आणि गाईड सातारा येथील सभागृहात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आलेले होते. बँकेचे सभासद, कार्यकर्ते, माजी सैनिक, शेतकरी, तरूण वर्ग, व्यापारी वर्ग सेवक व त्यांचे नातेवाईक, हजर सैनिक हावलदार अनिल बोबडे, नाईक राहुल फाळके, हावलदार संतोष चव्हाण,व हितचिंतक यांनी स्वयंस्फूर्तीने आपला व्यवसाय तसेच शेतीवाडीच्या सुगीच्या जबाबदा-या सांभाळून मोठया संख्येने सर्वांनी रक्तदान शिबिरात भाग घेतला. संघटना व बँकेचे अध्यक्ष कॅप्टन उदाजी निकम व सरस्वती सैनिक महिला बचत गटांच्या प्रवर्तिका व बँकेच्या संचालिका पुष्पा निकम, प्रमुख पाहुणे ई.सी.एच.एस पॉलिक्लिनिक साताराचे ऑफिसर इनचार्ज कर्नल डी. के. गोरे, ऑ. कॅप्टन गोपाळ गायकवाड, कर्नल अरूण जाधव, कमांडट तानाजी पवार, डॉ. गिरीष पेंढारकर, अध्यक्ष माउली ब्लड बँक, सातारा तसेच बँकेचे संचालक व संचालिका, महिला सेवक, दैनिक ठेव प्रतिनिधी, ग्राहक व हितचिंतक उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते प्रेरणास्थान कर्नल आर. डी. निकम व सरस्वतीताई निकम यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून दीपप्रज्वजन केले. आजच्या रक्तदान शिबिराचे प्रमुख पाहुणे कर्नल डी. के. गोरे आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले, कर्नल आर. डी. निकम यांच्या जयंतीदिनी आपण दरवर्षी रक्तदान शिबिराचे आयोजन करीत आहात. यासाठी सर्व घटकातून मोठया संख्येने रक्तदाते उपस्थित राहत आहेत. यासाठी मी सर्वांना धन्यवाद देतो. रक्तदान केल्याने इतरांना जीवदान मिळत असते. रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. आपण आयोजित करत असलेल्या रक्तदान शिबिरास दरवर्षी प्रचंड प्रतिसाद लाभावा. माउली ब्लड बँक, सातारा यांचेही सहकार्य मोलाचे आहे. संघटनेचे व बँकेचे अध्यक्ष कॅप्टन उदाजी निकम आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले, आपण हा उपक्रम दरवर्षी राबवत आहोत. याही वर्षी सैन्यदलातून सुटटीवर आलेल्या हजर सैनिकांनी आपल्या कुटुंबातून वेळ काढून रक्तदानास उपस्थिती दाखविली ही बाब कौतुकास्पद आहे. स्वयंस्फूर्तीने रक्तदान करणारे दाते आहेत. रक्तदान न करणारेही आहेत त्यांनी आपली मानसिकता बदलून अशा उपक्रमात सहभाग नोंदवायला हवा. मनुष्याच्या जीवनातील अडीअडचणी सांगून येत नाहीत. आपण प्रवास करत असताना कोठे अपघात झाला तर रक्ताने माखलेल्या व्यक्तीचे फोटो काढणारे असतात ही गोष्ट मनाला दुःख देणारी आहे. परंतु अशावेळी मदत करणारे फारच कमी लोक असतात. आपण समाजासाठी किती उपयोगी पडतो, याचा विचार व्हायला हवा. इतरांनाही आपण जागृत करायला हवे. रक्तदानातून इतरांची गरज भागत असते, आपण सर्वांनी या उपक्रमास मोलाचा हातभार लावलात मी आपल्या सर्वांचा आभारी आहे. श्री. अजित कुबेर, सेक्रेटरी माउली ब्लड बँक, सातारा यांनी संघटनेचे व बँकेचे अध्यक्ष कॅप्टन उदाजी निकम यांच्या मार्गदर्शनाखाली रक्तदान शिबिराचे आयोजन करीत असल्याबद्दल माउली ब्लड बँक सातारा यांचे वतीने प्रमाणपत्र देऊन आभार व्यक्त मानले. कार्यक्रमाचे अध्यक्ष कॅप्टन उदाजी निकम यांनी कर्नल डी. के. गोरे यांचा शाल श्रीफळ व लिंबाचे रोप देऊन  सत्कार केला. कार्यक्रमास बँकेचे संचालक, संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बँकेचे उपमहाव्यवस्थापक विलास मोटे यांनी केले.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular