परळी : सातारा डबेवाडी मार्गानजीक असलेल्या वळणावर रस्ता खचल्याने अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. नुकत्याच डांबरीकरण्यात आलेल्या मार्गावरच रस्त्याला भगदाड पडले आहे. अवजड वाहन गेल्यावर मातीचा असलेला भराव ढासळत असल्याने या मार्गावरची वाहतूक धोकादायक झाली आहे.
या मार्गावरुन सज्जनगड, ठोसेघर, चाळकेवाडी, लावंघर, पाटेघर, परळी या परिसरात जाणाऱया वाहनांची मोठी वर्दळ असते. पावसाने जोरदार सुरुवात केल्याने ठोसेघर धबधबा, सज्जनगड या ठिकाणी पर्यटकांच्या गाडया बेभान येत असतात. या रस्त्याच्या काहीच अंतरावर दोन ते तीन ठिकाणी रस्ता खचला आहे. तसेच काही ठिकाणी पुला खालचा भराव गेल्याने याही ठिकाणी रस्ता खचण्याचे सत्र सुरु झाले आहे.
बांधकाम विभागाने लक्ष देण्याची गरज
सातारा ते डबेवाडी मार्गावर तसेच गजवडी गावानजीक, कुस खुर्द गावाजवळ तसेच अलवडी रस्त्यावर रस्ता खचलेला आहे. त्या ठिकाणी कोणतेही बॅरिकेट लावण्यात आलेले नाही. एखादी मोठी दुर्घटना होण्याची वाट न पाहता बांधकाम विभागाने या मार्गावरची दुरुस्ती करावी अशी मागणी वाहन धारक तसेच स्थानिक ग्रामस्थ करत आहे.
सातारा डबेवाडी मार्गानजिक रस्ता खचला; वाहतूक धोकादायक
RELATED ARTICLES

