सातारा: आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी खर्शी तर्ङ्ग कुडाळ गावचा पाणीप्रश्न निकाली काढला. ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून विहीर खुदाई केली त्यासाठी आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी स्वत: 1 लाख रुपयांची मदत केली. यामुळे विहीरीचे काम पुर्णत्वास गेले आणि विहीरीला मुबलक पाणी लागले. दरम्यान, पाईपलाईन, डी.पी. व अन्य कामांसाठी आमदार ङ्गंडातून निधी उपलब्ध करुन खर्शीचा पाणीप्रश्न संपुष्टात आणू, अशी ग्वाहीही आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी दिली.
खर्शी या गावात जुनी पाणीपुरवठा योजना आहे. दरम्यान, वाढत्या दुष्काळी परिस्थितीमुळे गावातील सार्वजनिक विहीरीला पाणी कमी पडू लागले. त्यामुळे नवीन पाणी असलेल्या जागेत विहीर घेणे आवश्यक होते. त्यासाठी ग्रामस्थांची मिटींग झाली आणि वाघजाई शिवारातील 2 गुंठे जमीन निवडण्यात आली. सदर जागा मालक चंद्रकांत साहेबराव भोसले, सुर्यकांत साहेबराव भोसले आणि मालती बाबासाहेब चव्हाण यांनीही ही दोन गुंठे जमीन खर्शी ग्रामपंचायतीच्या नावे दानपत्र करुन मोङ्गत गावासाठी दिली. यानंतर ग्रामस्थांनी प्रत्येक नळ कनेक्शनप्रमाणे 2 हजार रुपये लोकवर्गणी काढण्याचा निर्णय घेतला. यानंतर विहीरीचे काम सुरु झाले पण, रक्कम कमी पडू लागली. यानंतर ग्रामस्थांनी आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्याकडे मदतीचा हात मागितला. आ. शिवेंद्रसिंहराजे यांनीही तत्काळ 1 लाख रुपयांची मदत ग्रामस्थांना केली.
आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी केलेल्या मदतीबद्दल सुहास भोसले, रामचंद्र मुळीक, विठ्ठल शिवणकर, धैर्यशिल भोसले, विजय भोसले, सुरेश शिवणकर, लक्ष्मण भोसले, डॉ. अशोक भिसे, विनायक शिवणकर, रामचंद्र जाधव, गुलाबराव भोसले, अशोक भोसले, अचलराव सोनावणे, सुधाकर नलवडे यांच्यासह सर्व ग्रामस्थांनी आ. शिवेंद्रसिंहराजे यांचे आभार मानले.
पाणीप्रश्न सोडवण्यासाठी आ. शिवेंद्रसिंहराजेंची लाखमोलाची मदत
RELATED ARTICLES

