शेतकर्यांच्या समस्या घेतल्या जाणून
सातारा: नाईक निंबाळकर देवस्था ट्रस्टच्या वतीने जावली (ता. फलटण) येथे सुरु करण्यात आलेल्या चारा छावणीस जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी भेट देऊन शेतकर्यांशी संवाद साधला. यावेळी फलटणचे प्रांताधिकारी संतोष जाधव यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
जावली येथील चारा छावणीमध्ये 371 शेतकर्यांची 1 हजार 158 मोठी तर 184 लहान जनावरे आहेत. त्या चारा छावणीला जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी भेट दिली. या वेळी त्यांनी छावणीतील पशुपालकांना जनावरांना चारा, पाणी, पेंड व्यवस्थित मिळते का? जनावरांना लस देण्यात आली आहे का याबाबतही विचारणा केली. या भेटीदरम्यान पवरील हजेरी, हालचाल रजिस्टर, छावणी भेट रजिस्टर, चारा वाटप रजिस्टर, चारा स्टॉक रजिस्टर, पेंड स्टॉक रजिस्टर, पशुपालक समिती रजिस्टर तसेच सीसीटीव्ही कॅमेर्यांची तपासणी केली.
चारा छावणीतील जनावरांचे टँगींग करण्यात यावे, तसेच या जनावरांचे 100 टक्के लसीकरण करावे,अशा सूचना त्यांनी यावेळी केल्या.
जावली येथील चारा छावणीस जिल्हाधिकार्यांची भेट
RELATED ARTICLES

