Wednesday, June 25, 2025
Homeठळक घडामोडीवनविभागाचे प्रधान सचिवही झाले वारीत सहभागी

वनविभागाचे प्रधान सचिवही झाले वारीत सहभागी

सातारा: संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज आषाढी वारी पालखी सोहळ्यामध्ये वन विभागाच्या वृक्षदिंडीचे तसेच सामाजिक वनीकरणाच्या रोपे वाटप स्टॉलचे उदघाटन राज्याचे वन विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे यांच्या हस्ते सपत्नीक करण्यात आले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी कैलास शिंदे, अपर जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड, पुणे सामाजिक वनीकरण वनसंरक्षक रंगनाथ नाईकडे, सातारा उपवनसंरक्षक भरतसिंग हाडा, सातारा सामाजिक वनीकरणाचे विभागीय वन अधिकारी धर्मवीर सालविठ्ठल, खंडाळा तहसिलदार तसेच वन व सामाजिक वनीकरण विभागाचे वनक्षेत्रपाल तसेच इतर अधिकारी उपस्थित होते.लोणंद येथील मुक्कामानंतर तरडगावसाठी मार्गस्थ झाला. या प्रस्थानावेळी श्री. खारगे यांच्या हस्ते सपत्नीक वृक्षदिंडीचे तसेच रोपे वाटप स्टॉलचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी दिंडीतील वारकर्‍यांना सामाजिक वनीकरण विभागाकडून तुळस, कढीपत्ता, बेल इ. प्रजातींच्या रोपांचे तसेच सीडबंग व सीडबलचे वाटप करण्यात आले. तरडगाव मुक्कामाच्या ठिकाणी विश्वस्त व दिंडी प्रमुख यांचेशी वन विभागाच्या दिंडीमध्ये 50 हुन अधिक अधिकारी-कर्मचारी सहभागी झाले होते. वनविभागाच्या दिंडीमध्ये वृक्षलागवड, वृक्षसंवर्धन, पर्यावरण रक्षण, 33 कोटी वृक्ष लागवड आदि विषयांच्या अनुषंगाने घोषवाक्ये असणा-या फलकांच्या माध्यमातून तसेच घोषणांच्या माध्यमातून वृक्ष लागवडीसंदर्भात व विभागाच्या विविध योजनांसंदर्भात जनजागृती करण्यात आली.
दरवर्षीप्रमाणे यावर्षीही श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि श्री संत तुकाराम महाराज पालखी मार्गावर वन विभाग व सामाजिक वनीकरण विभागाचे योजनांसंबंधी माहिती देणारे चित्ररथ दिंडीमध्ये सहभागी झालेले असून चित्रफित सादरीकरण व प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे माध्यमातून वृक्ष लागवड, वृक्ष संवर्धन, पर्यावरण रक्षणासंदर्भात व विभागांच्या योजनांसंदर्भात जनजागृती करण्यात येत आहे.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular