सातारा : अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक महासंघाचे वतीने ठाणे महापालिकेचे तरुण, धाडशी, कर्तबगार आयुक्त संदीप माळवी साहेब यांचा शिक्षक नेते माजी आमदार शिवाजीराव पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक महासंघाचे राष्ट्रीय कोष्याध्यक्ष सिदेश्वर पुस्तके, राष्ट्रीय सचिव तथा कार्यवाह अशोकराव पाटील, उपमहासचिव व शिक्षक बँक संचालक नामदेव रेपे, सातारा शिक्षक बँकेचे चेअरमन राजेंद्र घोरपडे, जिल्हाध्यक्ष महेंद्र जानुगडे, रघुनाथ पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते.
नवी मुंबई शिक्षण महापरिषद आयोजन संबंधि विचारविनिमय करण्यात आला. या शिक्षण उत्कांत सोहळ्यास महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, ग्रामविकासमंत्री, शिक्षणमंत्री तसेच जगविख्यात शास्त्रज्ञ विजय भटकर, महान संशोधक व शिक्षणतज्ज्ञ जी डी यादव यांना निमंत्रित करण्यात येणार आहे। विशेष प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्राचे कर्तबगार महसूलमंत्री नामदार चंद्रकांत दादा पाटील यांचा भव्य सत्कार महासंघाच्या वतीने करण्याचा ठराव करण्यात आला. प्राथमिक शिक्षक यांचे समोरील प्रलंबित प्रश्न आणि अडचणी तसेच नवीन शिक्षण धोरण या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात येणार आहे. विविध विषयांवरील तज्ज्ञांना, प्रशासकीय अधिकारी मार्गदर्शन करणार आहेत. ही शिक्षण महापरिषद लवकरच घेण्याचे ठरले. या कार्यक्रमाला महाराष्ट्रातील सुमारे एक लाख शिक्षक प्रतिनिधी उपस्थित राहतील्.
यावेळी जुनी पेन्शन सेलचे राज्य अध्यक्ष शंभूराजे पाटील सांगली हे उपस्थित होते.
आयुक्त संदीप माळवी यांचा शिक्षक नेते शिवाजीराव पाटील यांच्या हस्ते सत्कार
RELATED ARTICLES