म्हसवड : माण तालुक्यातील शेनवडी येथील श्रीनाथ म्हस्कोबा देवाच्या यात्रेनिमित्त आयोजित केलेल्या कुस्ती मैदानात खवसपूरच्या पै. महेंद्र गायकवाड याने बेनापूरच्या पै. राहूल सोडके यास चितपट करून प्रथम क्रमांकाचे पंचवीस हजार रुपयांचे बक्षीस पटकावले. प्रथम क्रमांकांचे बक्षीस युवराज कदम यांचे तर्फ देण्यात आले. दुसर्या क्रमांकाची कुस्ती पै. समाधान कोळी याने पै. रामदास पवार वर मात केली. त्यास पंधरा हजार अकरा रूपयांचे बक्षीस देण्यात आले हे बक्षिस कै.वसंतराव जगताप यांच्या स्मरणार्थ अभय जगताप यांच्या वतीने देण्यात आले.
तिसर्या क्रमांकाच्या कुस्तीत पै. शिवराज तेली व पै.लक्ष्मण शिंदे यांची कुस्ती बरोबरीत सोडवली. त्यांंना दहा हजार रुपयांचे बक्षीस विभागून देण्यात आले. हे बक्षीस सरपंच मोहनशेठ कदम यांच्या वतीने देण्यात आले. चौथ्या क्रमांकांच्या कुस्तीत पै.नारायण निंबाळकर याने पै.हणमंत काळेवर विजय मिळविला . सात हजार रुपयांचे बक्षीस हरिचंद्र खिलारे यांच्या वतीने देण्यात आले. पाचव्या क्रमांकाची कुस्ती बरोबरीत सोडवली त्यांना पाच हजार रुपयांचे बक्षीस विभागून देण्यात आले. हे बक्षीस धनाजी कदम यांच्या वतीने देण्यात आले. याशिवाय या कुस्ती मैदानात अनेक कुस्त्या चटकदार झाल्याने कुस्ती शौकिनांच्या डोळ्याचे पारणे फिटले.
हे कुस्ती मैदान यशस्वी करण्यासाठी सरपंच मोहनशेठ कदम, माजी सरपंच संजय खिलारे, उपसरपंच बबन शिरतोडे, संतोष खिलारे, सुरेश कदम सर, शिवाजी कदम, हरिचंद्र खिलारे, मारुती खिलारे, सुरज कदम, रंगराव खिलारे, हरिष कदम, यशवंत पारशी, यल्लापा खिलारे, विठ्ठलशेठ कदम, औदुंबर कदम, सुरेश गळवे, सागर कदम, नामदेव कदम, नंदू पारशी, ग्रामस्थांनी व यात्रा कमिटीने परिश्रम घेतले. यावेळी परशुराम पवार यांनी कुस्त्यांचे धावते समालोचन केले.
शेनवडी येथील कुस्ती मैदानात पै. महेंद्र गायकवाड विजयी
RELATED ARTICLES