Monday, June 23, 2025
Homeठळक घडामोडीकु.रिया जाधव यांचेकडून ज्ञानाची शिदोरीस वह्या भेट

कु.रिया जाधव यांचेकडून ज्ञानाची शिदोरीस वह्या भेट

तळमावले : पाटण तालुक्यातील डाकेवाडी (काळगांव) येथील कु.रिया यशवंत जाधव हिचा दुसरा वाढदिवस नुकताच साजरा झाला. हा वाढदिवस संस्मरणीय करण्यासाठी रियाचे कुटूंबीय प्रयत्नशील होते. रिया च्या वाढदिवसानिमित्त स्पंदन चॅरिटेबल ट्रस्ट ने राबवलेल्या ज्ञानाची शिदोरी या उपक्रमास एकूण 100 वह्या सपे्रम भेट देण्यात आल्या.
यावेळी रियाचे चुलते नवनाथ जाधव, कोमल जाधव, यशोदा जाधव, सखाराम जाधव, रेश्मा जाधव, गणपत डाकवे, कांता डाकवे, किरण डाकवे व अन्य मान्यवर उपस्थित होते.
वाढदिवसाप्रसंगी स्पंदन चॅरिटेबल ट्रस्टच्या सचिव रेश्मा डाकवे यांनी या वहयांचा स्वीकार केला. स्पंदन चॅरिटेबल ट्रस्टने सुरु केलेल्या या उपक्रमास सर्व स्तरांतून चांगला प्रतिसाद मिळत आहे.
यापुर्वी पार्श्‍वगायिका कविता राम, शिंगण प्रिंटर्स चे प्रदीप शिंगण (शेठ), सुनील पवार (नाणेगांव खुर्द चाफळ), डॉ.कोमल शेठ, ओंकार शेठ, कृष्णा चिंचुलकर, सुरज शिंदे, सतीश पवार, प्रमोद माने, कु.तनिष्का मोहिते, कु.अथर्व रुपेश शेळके, सचिन शिवाजी मोरे (फौजी), संजय डाकवे (शेठ), नुपुर दळवी, सुनील हुंबरे, मोहन डाकवे, कवी व ग्रामीण कथाकार शिवाजी मस्कर, विकास जाधव व अन्य मान्यवर यांनी मदत केली आहे.
यापूर्वीही स्पंदनच्या उपक्रमास लावणीसम्राज्ञी विजया पालव, अभिनेत्री वर्षा दांदळे, अभिनेते जगन्नाथ निवंगुणे, अभिनेते विजय वीर, अभिनेता सुयश शिर्के, अभिनेते सागर कारंडे, अभिनेते जगन्नाथ निवंगुणे, अभिनेते सचिन पाटील यांनी मदतीबरोबरच शुभेच्छा दिल्या आहेत. ग्रामीण भागातील गरजू लोकांपर्यंत आपली मदत पोहोचली पाहिजे या एकाच हेतूने सर्वजण स्पंदन चॅरिटेबल ट्रस्ट च्या ज्ञानाची शिदोरी या उपक्रमास सहकार्य करत आहेत. रविवार 10 जूनपर्यंत जास्तीत जास्त लोकांनी या ज्ञानाची शिदोरी या उपक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन स्पंदन चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष संदीप डाकवे मो.9764061633 यांनी केले आहे.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular