Tuesday, June 24, 2025
Homeठळक घडामोडीतांबवे परिसरातील पूरग्रस्तांना बँक ऑफ महाराष्ट्रतर्फे मदत

तांबवे परिसरातील पूरग्रस्तांना बँक ऑफ महाराष्ट्रतर्फे मदत

सातारा: सातारा जिल्ह्याची अग्रणी बँक असलेल्या बँक ऑफ महाराष्ट्राने उदभवलेल्या पूरपरिस्थितीमुळे बाधित कराड तालुक्यातील तांबवे परिसरातील पूरग्रस्तांना सहाय्य शिबिर राबवून बाधित कुटुंबांना जीवनावश्यक वस्तु अन्नधान्य, कपडे इ. वाटप केले.
यावेळी बँक ऑफ महाराष्ट्राचे महाप्रबंधक आयोजना महेश महाबळेश्वरकर, उपमहाप्रबंधक संजय हिरेमठ व अहिलाजी थोरात, सातारा विभागाचे प्रमुख वसंत गागरे, सहायक महाप्रबंधक रवींद्र चव्हाण, विवेक नाचणे, अमर मोरे, तांबवे गावचे सरपंच मंडलाधिकारी, तलाठी, ग्रामसेवक व इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
बँक ऑफ महाराष्ट्राचे कार्यकारी संचालक हेमंतकुमार टम्टा यांनी सध्याच्या संकटसमयी बँक मित्राद्वारे आवश्यकतेनुसार घरपोच सेवा देण्याविषयी संबंधित शाखेला सूचना केल्या. यावेळी तांबवे, नावडी, जमदाडवाडी, वेतळवाडी या गावातील अंदाजे 800 बाधित कुटुंबांना बँकेतर्फे मदत करण्यात आली.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular