वडूज: नायकाचीवाडी (ता. खटाव) येथील सुपुत्र व कलकत्ता येथील कंपनी न्यायप्राधिकरणाचे न्यायाधिश मदन भालचंद्र गोसावी यांना ब्राम्हण जागृती सेवा संघाच्या वतीने समाजभूषण पुरस्कार देवून गौरविण्यात आले.
यावेळी कराड येथील यशवंतराव चव्हाण स्मृति सदन हॉलमध्ये झालेल्या शानदार कार्यक्रमात पुरस्कार वितरण कार्यक्रम झाला. यावेळी चित्रपट अभिनेते आशुतोष कुलकर्णी, युवा किर्तनकार चारुदत्त आफळे, माजी आमदार डॉ. दिलीपराव येळगांवकर, संघटनेचे जिल्हाध्यक्ष अंकितजी काणे, नगरसेविका प्राची शहाने, विकास देशपांडे, मुकुंद चरेगांवकर, उद्योगपती रेवळनाथ शेंडे, घनश्याम पेंढारकर, सोमनाथ पाठक, केदार दिक्षीत, अमोल कुलकर्णी, अॅड. सोमनाथ भरमगुंडे, विनायक ठिगळे, प्रसाद बडवे, अमृत पोतदार, विलास गरवारे, डॉ. गिरीश जोशी, अॅड. मयुरेश देशपांडे, पप्पू इनामदार, केदार गोखले, सचिन कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी विशेष सरकारी वकीलपदी नियुक्ती झाल्याबद्दल अॅड. शुभदा कुलकर्णी, अॅड. किरण जोशी तसेच विविध सामाजिक उपक्रमात सक्रीय सहभाग घेणार्या प्रशांत कुलकर्णी यांचाही मान्यवरांच्या हस्ते विशेष गौरव करण्यात आला.
जिल्हा उपाध्यक्ष चित्तरंजन खटावकर, खटाव तालुकाध्यक्ष अभिषेक जोशी व सहकार्यांनी स्वागत केले. यावेळी बोलताना न्या. गोसावी यांनी समाजासमोरील सद्याची आव्हाने व त्यातून प्रगतीचे मार्ग कसे काढावे यासंदर्भात सविस्तर मार्गदर्शन केले. डॉ. येळगांवकर यांनी सेवा संघाच्या विधायक उपक्रमांचे कौतुक केले.
न्या. मदन गोसावींचा समाजरत्न पुरस्काराने सन्मान
RELATED ARTICLES