वडूज: पुणे येथील आ. महेशदादा लांडगे स्पोर्टस् क्लब येथे झालेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत वडूज येथील सोहम महेश गुरव याने 80 ते 92 किलो वजन गटात प्रथम क्रमांक मिळविला आहे. सतरा वर्षे वयोगटाच्या आतील विभागीय स्पर्धेसाठी त्याची निवड झाली आहे.
सोहम हा माजी नगराध्यक्ष डॉ. महेश गुरव यांचा सुपुत्र आहे. तो पुणे येथील छत्रपती शिवाजी विद्यालयात इयत्ता 9 वी च्या वर्गात शिकत असून हिंदकेसरी अमोल बुचडे कुस्ती प्रशिक्षण केंद्रात सराव करतो. त्याला श्री. बुचडे यांच्यासह शाळेचे शिक्षक श्री. काळोखे सर तसेच अन्य पाच प्रशिक्षकांचे मार्गदर्शन आहे. या यशाबद्दल त्याचे खा. श्री.छ. उदयनराजे भोसले, आ. जयकुमार गोरे, नगरसेवक शहाजी गोडसे, विजय शिंदे, संजय काळे, सोमनाथ जाधव, प्रदिप खुडे आदिंसह शहरातील विविध मान्यवरांनी अभिनंदन केले.
सोहम गुरवचे कुस्ती स्पर्धेत यश
RELATED ARTICLES

