Sunday, June 22, 2025
Homeठळक घडामोडीविद्यार्थ्याला पालकाचे प्रेम व संवाद अपेक्षीत: आरती बनसोडे

विद्यार्थ्याला पालकाचे प्रेम व संवाद अपेक्षीत: आरती बनसोडे

वडूज: कोणताही विद्यार्थी शालेय जीवनात यशस्वी होण्यासाठी त्यास पालकाचे प्रेम व कायम संवादाची गरज अपेक्षीत असते, असे मत मुंबई येथील सुप्रसिध्द शिक्षण समुपदेशक आरती बनसोडे यांनी व्यक्त केले.
येथील केब्रीज इंग्लिश मिडियम हायस्कूल मध्ये पालक व शिक्षक यांच्यासाठी दोन दिवस शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबीरात त्या बोलत होत्या. यावेळी संस्थेचे अध्यक्ष अलेक्स सर,मुख्याध्यापिका प्रीती अ‍ॅलेक्स, राष्ट्रीय खेळाडू जावेद मनोरे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी सौ. बनसोडे यांचे बहरू दया कळ्यांना या विषयावर मार्गदर्शन झाले. यावेळी त्यांनी सर्व शिक्षक व पालकांना संबोधीत केले. शिक्षण प्राणालीनुसार बदलत्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी उत्तम प्रकारे मार्गदर्शन केले. तसेच शिक्षकांनी मुलांना कृतीतून शिक्षण कसे दयावे याचे वेगवेगळ्या खेळातून पटवून दिले. शिक्षक व पालकांनी मुलाशी कसे वागावे याविषयी मार्गदर्शन केले.
ग्रामीण भागातील पालकांसाठी अश्या प्रकारच्या उच्च दर्जाचे शिबिर विद्यालयाकडून मोफत आयोजन केले. याबद्दल सर्व उपस्थित पालकांनी शाळेचे कौतुक केले.
प्रदीप बागल यांनी प्रास्ताविक तर सुचिता चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले. तृष्याली बागल यांनी आभार मानले. कार्यक्रमास शिक्षक, पालक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular