Tuesday, June 24, 2025
Homeठळक घडामोडीनुकसानग्रस्त शेतकर्‍यांसाठी दोन कोटी 63 लाखाचा निधी प्राप्त

नुकसानग्रस्त शेतकर्‍यांसाठी दोन कोटी 63 लाखाचा निधी प्राप्त

खटाव तालुकाः पहिल्या टप्प्यातील निधी जिल्हा बँकेकडे वर्गः तहसीलदार डॉक्टर अर्चना पाटील यांची माहिती
वडूज: परतीच्या पावसाने खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले होते. त्यानंतर राज्यपाल आणि नुकसानग्रस्त शेतकर्‍यांसाठी शेत पिकासाठी प्रति हेक्टरी आठ हजार रुपये व फळपिकासाठी 18 हजार रुपये अनुदान जाहीर केले. त्यानुसार खटाव तालुक्यातील शेतकर्‍यासाठी पहिल्या टप्प्यात दोन कोटी 63 लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे तालुक्यातील 55 गावातील शेतकर्‍यांना सदर अनुदान वाटप करण्यासाठी मध्यवर्ती सहकारी बँकेला हा निधी वर्ग करण्यात आला असल्याची माहिती तहसीलदार डॉ. अर्चना पाटील यांनी दिली.
त्यानुसार तहसील, पंचायत समिती व कृषी विभागाच्या वतीने तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहाय्यक यांनी तालुक्यातील 140 गावातील शेतकर्‍यांच्या शेतातील पिकांची पाहणी करून नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे केले. तालुक्यातील 10130 हेक्टर क्षेत्रावरील शेत पीक व फळ पिकांचे नूकसान झाल्याचा अहवाल वरिष्ठ स्तरावर पाठविला आहे. झालेल्या नुकसानभरपाई पोटी नऊ कोटी 73 लाख 93 हजार 310 एवढ्या रकमेची मागणीही करण्यात आली. राज्यपालांनी राज्यातील नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना शेत पिकासाठी प्रति हेक्टरी आठ हजार व फळ पिकासाठी 18000 रुपयांचे अनुदान जाहीर केले.
खटाव तालुक्यातील 22059 शेतकर्‍यांचे 10130 हेक्टर क्षेत्र बाधित झालेचे पंचनामे केले गेलेत त्यापैकी 6186 हेक्टर जिरायत क्षेत्र व 3481 बागायत क्षेत्रावरील शेत पिकांचे तर 462 हेक्टर क्षेत्रातील फळपिकांचे नुकसान झाले. पहिल्या टप्प्यात प्राप्त झालेल्या दोन कोटी 63 लाख अनुदान 55 गावातील शेतकर्‍यांच्या जिल्हा बँकेच्या खात्यावर वर्ग करण्यासाठी जिल्हा बँकेकडे वर्ग केले आहेत.
तालुक्यातील पाचवड ,गोरेगाववांगी तरसवाडी, मरडवाक, भांडेवाडी, दरुज, पिंपरी,म्हासुर्णे, येळीव, नांदोशी, पळसगाव, मानेवाडी-तुपेवाडी, कातरखटाव, एनकूळ ,रामोशीवाडी, पवारवाडी, नागनाथवाडी, फडतरवाडी, काळेवाडी, गारवडी, मोळ, दरजाई खटाव, वडी, लाडेगाव, गणेशवाडी, अंबेरी, गिरीजाशंकरवाडी, धकटवाडी, त्रिमली, भोसरे,खरशिंगे, लोणी, बुध, वडूज, तडवळे, मांडवे, काटकरवाडी, निढळ, उंचीठाणे, राजाचे कुर्ले, चोराडे, जांब, अंबवडे, गोपुज, कानकात्रे, कटगुण, गोरेगाव निम, थोरवेवाडी, रेवलकरवाडी, चिंचणी, भूषणगड, हुसेन पुर, अनपटवाडीआदि गावातील शेतकर्‍यांना नुकसान भरपाई मिळणार आहे.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular