वडूज: येथील हुतात्मा परशुराम विद्यालय व जु.कॉलेज च्या कार्यालयाची तोडफोड करून अज्ञात चोरट्यांनी बुधवारी मध्यरात्री जबरी चोरीचा प्रयत्न केला यावेळी चोरट्याशी झालेल्या झटापटीत शाळेचा शिपाई गंभीर जखमी झाला आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी की,बुधवारी रात्री शाळेच्या आवारात विकास भीमराव काळे( वय-23) हा शिपाई रात्रपाळीस होता. रात्री सव्वा बारा वाजणेच्या सुमारास 25 ते 30 वयोगटाचे दोन तरुण मुख्याध्यापकाचा खोलीचे कुलूप तोंडून घुसून त्या दोघांनी अंगात काळे रंगाचे फुलं भायाचे टी शर्ट व निळसर रंगाची पॅन्ट परिधान केले होती त्या दोघांनी तोंडास रुमाल बांधलेला होता. त्या दोघांना आपण हटकले असताना त्यातील एकाने तू जास्त हालचाल करू नकोस नाहीतर जीवे मारीन अशी धमकी देऊन तर दुसर्याने हातातील लोखंडी गजाने प्राचार्यांच्या केबिन मधील कपाटाचे कुलूप तोडून त्यातील कागद विषकटले यावेळी आपण जोराचा प्रतिकार केला असता शिपाई काळे यांच्या हातावर चोरट्यांनी चाकूचे वार केले. यावेळी चोरट्यांनी आपल्या गळ्यातील सोन्याचा बदाम लंपास करण्याचा जबरी प्रयत्न केला. या झटापटीत टेबलावरील काचाची तोडफोड होण्याबरोबरच चोरट्याच्या चेहर्यावरील रुमाल ही निसटले त्यामुळे सदर आरोपस आपण ओळखू शखतो असे काळे यांनी फिर्यादीत म्हटले आहे.याबाबत ची फिर्याद वडूज पोलीस ठाण्यात नोंद झाली असून अधिक तपास ह. शांताराम ओंबासे करीत आहेत.
टी. स्टॉलमध्ये चोरी
दरम्यान याच रात्री बसस्थानकासेजारी साई मंगल हे चहाचे दुकान फोडून अज्ञात चोरट्यांनी गल्ल्यातील रोकड व दुकानातील किरकोळ साहित्य लांबवले आहे. पोलीस ठाण्यापासुन केवळ हाकेच्या अंतरावर असलेल्या दुकानात चोर्या होऊ लागल्याने व्यापारी वर्गात असुरक्षिततेची भावना झाली आहे.
वडूज येथे जबरी चोरीचा प्रयत्न
RELATED ARTICLES