वडूज: दि बेंगलोर बुलियन रिफायनरी अॅन्ड सोेअर्स असोसिएशनच्या पंचवार्षिक निवडणूकीत सत्ताधारी सिद्धिविनायक पँनेलने बहुतांशी जागा बहुमताने जिंकून आपली सत्ता कायम राखली. या निवडणूकीत कलेढोणचे सुपुत्र सुरेश शेठ शिंदे, शितोळेनगर, निमसोडचे सुपुत्र विजयशेठ शितोळे यांच्या नेतृत्वाखालील सिध्दीविनायक पँनेलने 11 जागा जिंकून आपली सत्ता कायम राखली. तर विरोधी पॅनेलला फक्त दोन जागांवर समाधान मानावे लागले.
सिद्धिविनायक पँनेलच्या विजयी उमेदवारांमध्ये सचिव पांडुरंग सावंत (पुळकोटी), उपाध्यक्ष बबनराव कोडग, उपसचिव धनाजी माळी, खजिनदार सुभाष काटकर, उप खजिनदार युवराज साळुंखे, कमिटी सदस्य संजय शिंदे अनिल शिंदे (देविखिंडी), अनिल शिंदे(वाळेखिंडी), चेतन फडतरे, संतोष शेळके, सतीश कदम यांचा समावेश आहे. तर विरोधी पॅनेलला केवळ दोन जागेवर समाधान मानावे लागले. त्यामध्ये अध्यक्ष जालिंदर देशमुख व संचालक सदाशिव पवार यांचा समावेश आहे. या निवडणूकीत 307 सभासदांपैकी 231 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यामध्ये विनय शितोळे 105, बबनराव कॉलर 116, पांडुरंग सावंत 127, धनाजी माळी 130 सुभाष काटकर 126, युवराज साळुंखे 117, अनिल आपासो शिंदे 122, संजय भगवान शिंदे151, अनिल शंकर शिंदे 131, विकास फडतरे 129, संतोष नाना शेळके 122, सतीश राम हरी कदम 120, संजय बिले 105 अश्या प्रकारे मते मिळाली. सिध्दीविनायक पॅनेलच्या विजयी उमेदवारांचे सुरेशशेठ शिंदे, विलास फडतरे, कुंडलिक भोसले, नवनाथ तोरस्कर, जनार्दन देवकर, संस्थेच्या सर्व सदस्य यांनी अभिनंदन केले. श्री. मुनिराज, वनिता यांनी निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहिले.दरम्यान 2004 पासून सुरेश शेठ शिंदे यांनी संस्थेची बिन विरोध सत्ता आपल्या हाती घेतली व ती आजअखेर कायम आहे.
गड आला पण सिंह गेला
ही निवडणूक अतिशय चुरशीने झाली. या निवडणूकीत सिध्दीविनायक पॅनेलच्या उपाध्यक्ष, सचिव, उपसचिव, खजिनदार, उपखजिनदार तसेच संचालकाच्या सातपैकी सहा जागा निवडून आल्या. मात्र अध्यक्ष पदाचे उमेदवार व पॅनेलप्रमुख श्री. शितोळे यांचा निसटत्या मताने पराभव झाला. त्यामुळे गड आला पण सिंह गेल्याची भावना कार्यकत्यांमध्ये आहे.
बेंगलोर बुलियन रिफायनरी असोसिएशनवर सिद्धिविनायक पॅनेलचे वर्चस्व कायम
RELATED ARTICLES