वाई: गेल्या चार महिन्यांपासून माथाडी कामगारांना केलेल्या कामाची मजुरी नाही, वाई एमआयडीसी येथे असणार्या पी डी शहा कोल्ड स्टोरेज या कंपनीतील लोडिंग व अनलोडिंगची कामे करणारे नोंदित माथाडी कामगार गेली चार दिवस आपल्या विविध मागण्यांसाठी कंपनीबाहेर उपोषणास बसले आहेत.
वाई एमआयडीसीमध्ये असणार्या पी डी शहा कोल्ड स्टोरेज या कंपनीमध्ये महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल जनरल कामगार युनियन (रजि.)ची अस्थापना टोळी नंबर 45 लोडिंग व अनलोडिंग ची कामे नोंदित माथाडी कामगार करतात. या माथाडी कामगारांना मागील चार महिन्यांपासून कामाची मजुरी मिळालेली नाही या मजुरीसाठी इतर विविध प्रश्नांसाठी हे माथाडी कामगार उपोषण करत आहेत.
मागील काही दिवसांपासून कंपनी व्यवस्थापन नोंदित माथाडी कामगारांना माथाडी कायद्यानुसार काम न देता अनोंदीत कामगारांना काम देत आहे, याबाबत माथाडी कामगारांनी कंपनी व्यवस्थापनाशी चर्चा केली परंतु यातून कोणताही तोडगा निघाला नाही. उलट कंपनी व्यवस्थापनाने खोटे गुन्हे या कामगारांवर दाखल केले आहेत, यामुळेच या कामगारांनी उपोषणाचे हत्यार उपसले आहे .
कंपनी व्यवस्थापनाने माथाडी कायद्याची अंमलबजावणी करावी, माहे डिसेंबर, जानेवारी,फेब्रुवारी,मार्च मध्ये केलेल्या कामाची मजुरी व महाराष्ट्र शासनाची 30% लेवीची रक्कम माथाडी मंडळात जमा करावी,अनोंदीत कामगारांना काम न देता नोंदित माथाडी कामगारांना काम द्यावे,माथाडी कामगारांवर दाखल केलेले खोटे गुन्हे मागे घ्यावेत,माथाडी कामगारांच्या अडचणी संघटना प्रतिनिधी व कामगार आयुक्त यांच्या दालनात समक्ष सोडवाव्यात.
या माथाडी कामगारांच्या प्रमुख मागण्या असून या मागण्या पूर्ण न झाल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा संघटनेने निवेदनाद्वारे दिला आहे.
वाई येथे माथाडी कामगारांचे आमरण उपोषण
RELATED ARTICLES