Tuesday, June 24, 2025
Homeठळक घडामोडीप्रियकराच्या मदतीने आईनेच केला मुलाचा खून

प्रियकराच्या मदतीने आईनेच केला मुलाचा खून

* मुलाच्या मृत्यू प्रकरणी आई व प्रियकराला पाच दिवसांची कोठडी* धोम डाव्या कालव्यात आढळला होता मृतदेह *
वाई: गौरव प्रकाश चव्हाण (वय10) रा.वृंदावन कॉलनी, नावेचीवाडी, वाई या अल्पवयीन मुलाचा मृतदेह धोम डाव्या कालव्यात आढळला होता. या प्रकरणी मुलाची आई अश्‍विनी प्रकाश चव्हाण (वय 28) व तिचा प्रियकर सचिन शिवराम कुंभार (वय 41) रा. बावधन (ता.वाई) या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
वाई पोलिस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी की, रविवार दि. 28 रोजी रात्री आठच्या सुमारास गौरव हा गंगापुरी येथील यात्रा मैदानावर मनोरंजनाचा कार्यक्रम पाहण्यासाठी म्हणून गेला होता. सोमवार दि.29 रोजी दुपारी तीनच्या सुमारास धोम डाव्या कालव्यात देगांव गावाच्या हदद्ीत परिसरातील नागरीकांना मुलाचा मृतदेह आढळला होता.
याबाबत माहिती मिळताच नातेवाईकांनी घटनास्थळी जावून खात्री केली असता सदरचा मृतदेह हा गौरवचाच होता. पोलिसांनी कसून तपास केला असता मुलाची आई अश्‍विनी चव्हाण हिने दिलेल्या माहितीमध्ये विसंगती आढळून आल्याने पोलिसांचा संशय बळावल्याने सखोल चौकशी करून अश्‍विनी व तिचा प्रियकर सचिन कुंभार याला पोलिसांनी ताब्यात घेवून पोलिसी खाक्या दाखविल्यानतंर संपुर्ण प्रकरणाची कबूली दिली.
दिलेल्या माहितीनुसार अश्‍विनी चव्हाण व तिचा प्रियकर वाई औद्योगिक वसाहतीत एकाच खासगी कंपनीत कामाला होते. आश्‍विनीने दिलेल्या माहितीनुसार सचिन हा नवर्‍याला व मुलाला जीवे मारण्याची धमकी देत होता.
आश्‍विनी व सचिन यांनी रविवार दि.28 रोजी गंगापुरी येथील यात्रा मैदानावरून रात्री साडेदहाच्या सुमारास दिड किलोमिटर अंतरावर असणार्‍या शेलारवाडी रोडवरील धोम डाव्या कालव्यावर नेहून थंड पेयात गुंगीचे औषध देवून गौरव यास सचिनने पाण्यात ढकलले व गौरवचा मृतदेह दुसर्‍या दिवशी आढळून आला होता.
आरोपींना बुधवार दि. 8 रोजी दुपारी आडीच वाजता वाई न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोघांना पाच दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे.
जिल्हा पोलिस प्रमुख तेजस्वी सातपुते, उपविभागीय पोलिस अधिकारी अजित टिके यांनी दिलेल्या सूचनेनुसार वाई पोलिस ठाण्याचे पोलीस उपनिरिक्षक आनंदराव खोबरे, पो. उपनिरिक्ष महेंद्र निबांळकर, राजेंद्र कदम, त्रिबंक अहिरेकर, कृष्णा पवार, प्रशांत शिंदे, सोमनाथ बल्लाब, ओंकार गरूड, शिवाजी जाधव, हणमंत दडस यांनी कसून तपास केला असता यांनी कसून तपास यांच्या पथकाने परिश्रम घेतले.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular