वाई : आजच्या इंटनेटच्या फास्ट युगामध्ये वाचनसंस्कृती मागे पडत चालली आहे. इंटरनेटने पारंपारीक पुस्तक व वाचनसंस्कृतीवर आक्रमण केले आहे. अशा युगातही वाईसारख्या छोटया शहरामध्ये हे पुस्तक प्रदर्शन भरवून संयोजकांनी वाचन संस्कृती जपण्यासाठी केलेले प्रयत्न कौतुकास्पद आहेत, असे उदगार प्रसिध्द कादंबरीकार अॅड. उमेश सणस यांनी काढले.
लो. टिळक स्मारक संस्थेच्या इमारतीमध्ये कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मी ग्रंथदालनाच्यावतीने 11 जून ते 30 जून पर्यंत पुस्तक प्रदर्शन आयोजीत केले आहे. या प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगीत ते बोलत होते. यावेळी ज्येष्ठ विचारवंत सतीश कुलकर्णी, अनिल जोशी, वसंतराव बोपर्डीकर, शामला पाटणकर यांची प्रमुख उपस्थिती होती.सदर प्रदर्शन सकाळी 10 ते रात्री 8.30 पर्यंत सर्वांसाठी विनामुल्य खुले राहणार असून विविध विषयांवरील सुमारे एक लाखाहून अधिक पुस्तके उपलब्ध करण्यात आली आहेत. यात चरित्र, आत्मचरित्र, कथा, कादंबर्याम, ललित लेख, नाटक, कविता, ऐतिहासिक, पर्यावरण, धार्मिक, पाककला, आरोग्य, महिला विषयक, बालवाडमय, तसेच इंग्रजी विविध विषयांवरील पुस्तके उपलब्ध असून वाचकांना सवलतीच्या दरामध्ये खरेदी करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.
या प्रदर्शनाचा लाभ सर्वांनी घ्यावा असे आवाहन यावेळी आयोजकांच्यावतीने करण्यात आले.
लो. टिळक स्मारक संस्थेचे अध्यक्ष प्रा. सदाशिव फडणीस यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. अनिकेत बिराडे यांनी प्रास्ताविक केले. पुस्तक प्रदर्शनाच्या कार्यक्रमात वाई करांचा चांगला प्रतिसाद लाभला.
‘इंटरनेटने पारंपारिक पुस्तक व वाचन संस्कृतीवर केले आक्रमण’
RELATED ARTICLES