Sunday, June 22, 2025
Homeठळक घडामोडीवाई रोटरी क्लबचे शैक्षणिक क्षेत्रातील कार्य आदर्शवत: विष्णू मोंढे

वाई रोटरी क्लबचे शैक्षणिक क्षेत्रातील कार्य आदर्शवत: विष्णू मोंढे

वाई : गेल्या वर्षभरात वाई रोटरी क्लबने वाई तालुक्यातील प्राथमिक शाळेत, व माध्यमिक हायस्कूल मध्ये हॅपी स्कूल व डिजिटल क्लासरूम साठी लाखो रुपयांचा निधी रोटरीच्या माध्यमातून खर्च करून तालुक्यातील चाळीस शाळांमधील शैक्षणिक बदल करण्यात गेल्या वर्षभरात वाई रोटरी क्लब यशस्वी झाली आहे, त्यांचे शैक्षणिक क्षेत्रातील कार्य इतरांसाठी आदर्शवत आहे, असे प्रतिपादन प्रांतपाल विष्णू मोंढे यांनी वाई रोटरी क्लबच्या वतीने आयोजित विविध कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना काढले. आसरे हायस्कुल, ग्लोरी स्कूल मेणवली आणि द्रविड हायस्कूल वाई येथील हॅपी स्कूलच्याउद्घाटनासहतालुक्यातील चाळीस शाळांमध्येस्यानेटरी न्यापकिन डीसपोजेबल ड्रमचे वाटप प्रांतपाल विष्णू मोंढे यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
यावेळी आसरे स्कूल मध्ये मिनी सायन्स सेंटर, खेळाचे साहित्य, लायब्ररी कपाट, एक हजार पुस्तके, डिजिटल क्लास रूम, स्यानेटरी न्यापकिन डीसपोजेबल ड्रम असे ऐकून पाच लाखांचे साहित्य रोटरीच्या माध्यमातून देण्यात आले. तसेच ग्लोरी स्कूल मेणवली मध्ये मुलामुलींचे सेपरेट हँड वॉश युनिट, पाण्याची टाकी, प्लबिंग काम, दोन डिजिटल क्लास रूम, खेळाचे साहित्य, लायब्ररी कपाट, दोन हजार पुस्तके, स्यानेटरी न्यापकिन डीसपोजेबल ड्रम,हँड वॉशचे 25 लिटर लिक्विड, टॉयलेट क्लिनर लिक्विड 25 लिटर असे शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. द्रविड हायस्कूल सह चाळीस शाळांमध्ये चाळीस स्यानेटरी न्यापकिनडीसपोजेबल ड्रम देण्यात आले.
संपूर्ण वर्षभरात वाई तालुक्यातील पंचवीस शाळांमध्ये हा उपक्रम राबविण्यात आला.
या सर्व कार्यक्रमाला प्रांतपाल रो. विष्णू मोंढे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते, तसेच नवनियुक्त प्रांतापाल डॉ. ओमप्रकाश मोतीपवळे, प्रकल्प प्रमुख स्वाती हेरकळ, सहप्रांतापाल दिलीप प्रभुणे, वाई रोटरी क्लबचे अध्यक्ष प्रमोद शिंदे, सचिव अजित क्षीरसागर, सर्व रोटरीयन, शाळांचे मुख्याद्यापक, शिक्षक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
त्याच प्रमाणे 10 जून रोजी रोटरी क्लब वाईला 45 वर्ष पूर्ण झाले. या निमित्ताने माजी प्रांतापाल इस्माईल पटेल, ओमप्रकाश मोतीपवले, या प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते डॉ. शरद अभ्यंकर,अरविंद पोरे, अरुण पतंगे या रोटरी सदस्यांचा सन्मान करण्यात आला. तसेच प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते द्रविड हायस्कूलच्या प्रांगणात पूर्ण वाढ झालेल्या पंधरा फुट उंच असणार्‍या लिंबाच्या झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले, त्याचप्रमाणे पावसाळ्यात वाई तालुक्यातील उजाड डोंगरावर वाईतील सामाजिक संस्थांच्या मदतीने पूर्ण वाढ झालेल्या वडाच्या झाडांचे वृक्षारोपण करण्यात येणार आहे. तसेच त्या झाडांच्या संगोपनाची जबाबदारी रोटरी उचलणार असल्याची माहिती वाई रोटरीचे अध्यक्ष प्रमोद शिंदे यांनी दिली आहे.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular