वाई: किल्ले वंदनगडवर श्री शिव वंदनेश्वर प्रतिष्ठानने पुढाकार घेवून आयोजित केलेली महामोहिम यशस्विरित्या पार पाडली. या महामोहिमेला विविध प्रतिष्ठानचे लोक सहभागी झाले होते,यामध्ये शिवसह्याद्री अकॅडमी वाई,सह्याद्रि भटकंतीवाई,ध्यास दुर्गसंवर्धनचा,टीम दातेगड, श्री शिववंदनेश्वर प्रतिष्ठाण, चंदन वंदन प्रांत, महाराष्ट्र राज्य
वरील सर्व संस्था एकत्र येऊन वंदनगडावर असण्यार्या कुशावर्त तळे आणि पहारेकर्यांच्या जागा या ठिकाणी संवर्धनाचे कार्य करण्यात आले. किल्ल्यावर असणार्या कुशावर्त नामक तळ्यातील गाळ काढण्याचे काम सध्या युद्ध पातळीवर सुरु असून रविवार दि.23 जून रोजी सुमारे 100 मावळ्यांनी या त्यातील गाळ काढून आपली सेवा बजावली . तळे क्षेत्रफळाने मोठे असल्याने यातील गाळ काढण्यासाठी 1 वर्षाचा कालावधीही पुरेसा नाही तरी ही या मावळ्यांचे अविरत प्रयत्न चालू आहे. मावळ्यांची संख्या ऐनवेळी वाढल्याने दोन टीम बनवून एक टीम तळ्यातील गाळ काढण्यासाठी तर दुसरी टीम पहारेकर्यांच्या दरवाजा पाशी असलेली दगड माती काढण्यासाठी सज्ज झाली. दरवाजापासून चुन्याचा घाना या ठिकाणी जाण्यासाठी पुरातन काळी एक वाट होती ती सध्या दगड आणि मातीने मुजलेली असल्याने (10 ते 12 फूट उंच ) या ठिकाणची संवर्धन मोहीम हि त्याच दिवशी घेऊन हि वाटही मोकळी करण्यात आली. यावेळी गडावर तोफगोळे तसेच जुनी खापरे , विटा सापडल्या. यामध्ये विशेष म्हणजे जिकडे आजकल पोर अश्या कार्याला येत नाहीत, तिकडे मुलींसुध्दा श्रमदान करण्यासाठी आल्या होत्या.त्या मुलींचा त्याबद्दल त्यांचा अभिमान वाटतो. म्हणतात ना स्त्री पुरुषयांच्या खांद्याला खांदा लावून काम करते,याच ज्वलंत उदाहरण म्हणजे किल्ले वंदनगड संवर्धन मोहीम. या पूर्वी श्री शिववंदनेश्वर प्रतिष्ठानने गडावरील महादेव मंदिर, दारुगोळा कोठार स्वच्छता, काळूबाई मंदिर डागडुजी, ब्राह्मण आळीतील मार्ग खुला करणे, तळ्यात उतरणार्या पायर्या, चोर दरवाजा पूर्णतः मातीत मुजलेला खुला केला, मुख्य प्रवेशद्वारातील दगडी काढणे आणि पुरातन वाट खुली करणे, गडावर असणार्या 5 समाध्यांची स्वछता व संवर्धन केले आहे.
नेहमीप्रमाने डॉक्टर निकम हे 60 वर्षीय युवक हि आपल्या शिवकार्याला आले होते .तसेच समाजसेवक जयवंत निकम,पवार साहेब हे ही उपस्थित होते.
श्री शिव वंदनेश्वर प्रतिष्ठानच्या पुढाकाराने वंदनगडावर स्वच्छता मोहिमेचे आयोजन
RELATED ARTICLES