वाई : पंजाब येथे झालेल्या ज्युनिअर पिंच्याक सिल्याट राष्ट्रीय स्पर्धेत सातारा जिल्ह्यातील दिनेश मोरे (महाबळेश्वर) दिव्या धुमाळ (कोरेगाव) साहिल पवार (कराड) या खेळाडूंनी चमकदार कामगिरी करत सुवर्ण पदके मिळवल्याने महाराष्ट्र संघाला दुसरा क्रमांकाचे स्थान मिळाले.
इंडियन पिंच्याक सिल्याट फेडरेशन आयोजित ज्युनिअर राष्ट्रीय स्पर्धा गुरुनानक देव युनिव्हर्सिटी पंजाब येथे पार पडली या स्पर्धेत 31 राज्यातील930 खेळाडूंनी सहभाग घेतला होता.
महाराष्ट्र संघात 33 मुले मुली खेळाडूची निवड झाली होती. क स्पर्धेत प्रेरणा मोरे, स्नेहा बोर्हाडे, सुजल माने, ऋतुजा कानगुडे, जोती यादव, सोमनाथ सोनावणे, संकेत चाटे, हर्ष सर्वे या खेळाडूनीही पदके मिळवली सातारा जिल्ह्यातील खेळाडूंच्या चमकदार कामगिरी मुळे महाराष्ट्र संघाला दुसर्या क्रमांक मिळाला.
या सर्व खेळाडूना किशोर येवले अकबरराज अत्तार राजश्री जानकर यांचे मार्गदर्शन लाभले पिंच्याक सिल्याट महाराष्ट्र राज्य अध्यक्ष सुरेंद्र प्रतापसिंग महासचिव किशोर येवले अॅड. पी.सी.पाटील सातारा जिल्हा अध्यक्ष निसार शेख उपाध्यक्ष संतोष चौधरी सचिव एस. के.वरे खजिनदार दीपाली येवले व पदाधिकारी यांनी अभिनंदन केले.
पंजाब येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्र संघाला दुसरे स्थान
RELATED ARTICLES

