Sunday, June 22, 2025
Homeठळक घडामोडीएक नेता; एक आवाज...उदयन महाराज जयघोषाने दक्षिण काशी दुमदुमली

एक नेता; एक आवाज…उदयन महाराज जयघोषाने दक्षिण काशी दुमदुमली

वाई: सातारा लोकसभा मतदारसंघातील भाजप व मित्र पक्ष महायुतीचे उमेदवार श्री. छ. उदयनराजे भोसले आणि वाई विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार मदनदादा भोसले यांच्या प्रचारार्थ वाई शहरात रेकॉर्डब्रेक रोड शो करण्यात आला. या रोड शोने विरोधकांना धडकी भरली. यावेळी एक नेता एक आवाज उदयन महाराज उदयन महाराज या घोषणांनी दक्षिण काशी दुमदुमून गेली.
महायुतीचे सातारा लोकसभेचे उमेदवार श्री. छ. उदयनराजे भोसले आणि वाई – महाबळेश्वर- खंडाळा विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार मदनदादा भोसले यांच्या प्रचारार्थ बुधवारी सकाळी वाई शहरात भव्य रोड शो करण्यात आला. यावेळी शिवसेनेचे नेते पुरुषोत्तम जाधव, नगराध्यक्ष रोहिणी शिंदे, विजयाताई भोसले, अनुराधा भोसले, विकासअण्णा शिंदे , बापूसाहेब शिंदे, राजाभाऊ खरात, शेलार मामा, रिपाइंचे जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड, शिवसेनेचे शहर प्रमुख गणेश जाधव, ऍड. विलास आंबेकर, ऍड. विकास पवार, माणिक पवार, तानाजी मांढरे, अन्वर मुजावर यांच्यासह भाजप, शिवसेना, रिपाइं व मित्र पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी ठिकाणी फटाक्यांची आतषबाजी करुन स्वागत करण्यात आले. उदयनराजे भोसले आणि मदनदादा भोसले यांच्या समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी करत शक्तिप्रदर्शन केले.
वाई शहरात भाजपचा नारा या रोड शो दरम्यान जोरदार घुमला. ठिकाणे व्यापारी, नागरिक यांनी त्यांचे स्वागत केले. रस्त्याच्या दुतर्फा उदयनराजे यांना पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. ठिकठिकाणी सुहासिनींनी त्यांचे औक्षण केले.
शहरात अनेक ठिकाणी उदयनराजे आणि मदनदादा यांच्यावर फुलांचा वर्षाव करण्यात आला. या रोड शो मुळे वाई शहरात भगवे वादळ निर्माण झाले होते.
पाचगणीतील पदयात्रेलाही उत्स्फूर्त प्रतिसाद
उदयनराजे आणि मदनदादांच्या प्रचारार्थ पाचगणी येथे भव्य पदयात्रा काढण्यात आली. यावेळी उदयनराजे भोसले,मदनदादा भोसले, नगराध्यक्ष लक्ष्मी कराडकर,शिवसेनेचे नेते पुरुषोत्तम जाधव, विकासअण्णा शिंदे यांच्यासह भाजप व मित्र पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. पाचगणीत मित्र पक्षांच्यावतीने जोरदार पदयात्रा काढून शक्तीप्रदर्शन करण्यात आले.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular