कुडाळ : मेणवली, ता. वाई येथे एका 52 वर्षीय इसमाचा अज्ञात व्यक्तीने डोक्यात वार करून निर्घृण खून झाल्याची घटना घडली आहे.
याची माहिती गावचे पोलीस पाटील संदेश वैराट वाई पोलीस ठाण्यात कळवली त्या वरून डीवायएसपी अजित टिके पोलीस निरीक्षक आनंदराव खोबरे उपनिरीक्षक रमेश मोतेवार ते आपल्या पोलीस फौज फाट्यासह घटनास्थळी दाखल झाले आहे. डीवायएसपी अजित टिके यांनी तपासाची चक्रे गतिमान करून काही सौंशहीतांना ताब्यात घेण्याच्या सूचना पोलीस निरीक्षक खोबरे यांना दिल्या आहेत याबाबत वाई पोलिसाकड़ूंन मिळालेली माहिती नुसार दिलीप कृष्णा शिखरे वय 52 रा. मेणवली, ता. वाई असे खून झालेल्या इसमाचे नाव आहे हा खून मद्यरात्री करण्यात आल्याचे दिसून येत असून डोक्यात मार लागून त्याचा मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. वाई पोलिसानी मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला असून तो शवविच्छेदना साठी वाईच्या ग्रामीण रुग्णालयात पाठवला आहे या खुनाची नोंद वाई पोलीस ठाण्यात झाली आहे त्याचा अधिक तपास पोलीस निरीक्षक आनंदराव खोबरे करत आहेत.
घटनास्थळी डॉग स्कॉड, फिंगरप्रिंट तज्ञ ही दोन पथके दाखल झाली आहेत.या अचानक झालेल्या खुनामुळे मेणवली गावात घबराटीचे वातावरण पसरले असून यातील खून करणारे आरोपी पोलिसानी शोधावेत अशी चर्चा मेणवली गावात सुरू आहे.
मेणवलीत वार करून इसमाचा खून दोन संशईत पोलिसांच्या ताब्यात
RELATED ARTICLES