भुईंज : आयुष्याची सुरूवात 500 मेट्रिक टन खांडसरीपासून ते ही करताना शेतकरी कुटुंबातून घराबाहेर पडण्याचा मान्य करावा लागलेला आदेश आणि बघता बघता प्रामाणिक आणि कष्टाच्या जिद्दीवर दैनंदिन 40 हजार मेट्रिक टन ऊस गाळप क्षमतेच्या व्यवसायापर्यंंत मारलेली मजल सारा प्रवास थक्क करणारा. या प्रवासात दैनंदिन 3 लाख लिटर क्षमतेचा आसवणी प्रकल्प, 117 मेगावॅट क्षमतेचा को-जनरेशन प्रकल्प आणि नजिकच्या काळात हे सारंच काही दुप्पट, तिप्पट, चौप्पट करण्याचा निर्धार. अशी क्षमता बाळगून असणारे निराणी शुगर ग्रुपचे संस्थापक-चेअरमन मृगेश निराणी यांनी किसन वीर उद्योग समुहाच्या उपक्रमांना केलेला सलाम. त्यांच्यातील थोरवीची प्रचिती देणारा ठरला.
कर्नाटकचे माजी मंत्री तथा तिसर्यांदा आमदार म्हणून कर्नाटकच्या विधानसभेत प्रभावीपणे कामकाज करणारे श्री. निराणी हे निराणी उद्योग समुहाचे सर्वेसर्वा त्यांना जेव्हा किसन वीर उद्योगसमुहाची माहिती समजली. तेव्हा त्यांनी आवर्जुन या उद्योग समुहाला सदिच्छा भेट दिली. या ठिकाणावरील 30 हजार वृक्षांची लागवड तसेच कारखान्याच्या माध्यमातून झालेल्या 2 लाख वृक्षांची लागवड, एका कारखान्याचे झालेले तीन कारखाने, को-जन प्रकल्प, सीएनजी गॅस प्रकल्प, तीन डिस्टीलरी प्रकल्प, इथेनॉल प्रकल्प, शहिद जवान स्मृतिस्मारक, सभासद, कामगार आणि स्थानिक कार्यक्षेत्रातील शहिद जवानांच्या कुटुंबियांना देण्यात येणारी 2 लाखांची आर्थिक मदत अशा अनेक उपक्रमांची माहिती ऐकुण थक्क झालेले श्री. निराणी म्हणाले, मदन भोसले यांनी तमाम शेतकरी सभासदांच्या हिताचेच काम केले. हे नेतृत्व खाजगी उद्योगामध्ये असते तर वैयक्तिक पातळीवर फार मोठे झाले असते. मात्र, स्वतःचा विचार सोडून या माणसाने केलेला तमाम शेतकरी, जनतेचा विचार ही जगातिक पातळीवर थक्क करणारी बाब आहे. याचे मोल ज्याला समजले तोच मोठा. यावेळी किसन वीर कारखान्याची डॉक्युमेंटरी पाहुन ते थक्क झाले.
साईबाबांची मुर्ती, शॉल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन मदनदादा भोसले यांनी मृगेश निराणी यांचा सत्कार केला.
यावेळी किसन वीर कारखान्याचे उपाध्यक्ष गजानन बाबर, निराणी शुगरचे टेक्नीकल डायरेक्टर मुत्ताप्पा मुतनाळ, प्रल्हादराव साळुंखे, संचालक नंदकुमार निकम, नवनाथ केंजळे, मधुकर शिंदे, कार्यकारी संचालक अशोक जाधव, विलासभाऊ जाधव, अर्जुन भोसले, भुईंजचे उपसरपंच प्रशांत जाधव, शेखर भोसले पाटील, जयवंत साबळे, अनिल वाघमळे अॅड. मेघराज भोईटे, मुंबई येथील उद्योजक पंकज शहा, सुनिल शिवथरे, हणमंत गायकवाड, मदन शिंदे, बाळकृष्ण कांबळे, मोहन भोसले, ज्ञानदेव शेलार, विठ्ठल इथापे, संतोष जमदाडे, विकास जमदाडे, रमेश शिंदे, संभाजी शिंगटे, रमेश इथापे, बाळासाहेब इथापे, सुरेश मतकर, सागर भिंताडे यांच्यासह कारखान्याचे अधिकारी, कर्मचारी, कारखान्याचे सभासद उपस्थित होते.
40 हजार मेट्रिक टन क्षमतेला भारावली 10 हजार मेट्रिक टन क्षमता मृगेश निराणी; किसन वीर ला दिली सदिच्छा भेट
RELATED ARTICLES