सातारा: माजी सहकार न्यायाधिश रामकृष्ण कदम रा.बिभवी ता.जावली सध्या रा. शाहुपुरी सातारा यांच्या पत्नी सुनंदा उर्फ ताराबाई रामकृष्ण कदम यांचे वयाच्या 75 व्या वर्षी अल्पशा आजाराने आज निधन झाले.त्याच्या पश्चात पती, एक मुलगा, एक मुलगी, सून नातवंडे असा परिवार आहे. त्यांचा सावडण्याचा विधी शुक्रवार दि.4 जानेवारी 2019 रोजी सकाळी 9 वाजता माहुली येथे होणार आहे. त्यांच्या अंत्ययात्रेत सातारा जिल्हा वकिल संघटनेचे पदाधिकारी, सदस्य, डॉक्टर वर्ग तसेच दैनिक ग्रामोध्दारचे संपादक बापूसाहेब जाधव, राष्ट्रवादी काँग्रेस सेवादलाचे प्रदेश मुख्य संघटक राजेंद्र लवंगारे तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर सहभागी झाले होते.