Thursday, June 19, 2025
Homeठळक घडामोडीमुस्लीम खाटीक समाजाचे  नेते ऍड.अख्तरनवाज रंगलाल कलाल यांचे निधन

मुस्लीम खाटीक समाजाचे  नेते ऍड.अख्तरनवाज रंगलाल कलाल यांचे निधन

आटपाडी दि .१९ ( प्रतिनिधी )
माणदेशी आटपाडी चे सुपुत्र , प्रसिद्ध वकील , मुस्लीम खाटीक समाजाचे राज्याचे मातब्बर नेते अॅडव्होकेट अख्तरनवाज रंगलाल कलाल यांचे काल  वाई येथे न्यायालयाच्या आवारात आलेल्या  हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले .
सातारा येथील कबरस्थान मध्ये आज त्यांचा दुपारी दफनविधी केला गेला . रविवारी दि .२० रोजी  सकाळी आठ वाजता त्यांच्या तिसऱ्या दिवसाचा जियारतचा धार्मिक विधी केला जाणार आहे.
दिवंगत . अख्तरनवाज कलाल यांच्या पाठीमागे पत्नी , तीन मुले , सुना , नातवंडे , अन्य नातेवाईक असा मोठा परिवार आहे .
आटपाडी एज्यूकेशन सोसायटीचे संस्थापक सचिव दिवंगत रंगलाल कलाल सर यांचे सुपुत्र असलेल्या  ऍड. अख्तरनवाज कलाल यांचे प्रारंभीचे २५ वर्षे आटपाडीतच वास्तव्य होते . तथापी गत ३५ वर्षापासून सातारा येथे वकीली करत वास्तव्यास होते  .आटपाडी तालुक्यात मोठया प्रमाणावर मित्रपरिवार असलेल्या अॅड .अख्तरनवाज यांचे महाराष्ट्रातील मुस्लीम खाटीक समाजाच्या संस्थात्मक बांधणी आणि समाजकार्यात मोठे योगदान आहे . त्यांच्या अकाली जाण्याने समाजाचे मोठे नुकसान झाले असून आपले मार्गदर्शक , वडिल बंधू हरपल्याची भावना मुस्लीम खाटीक समाजाचे प्रदेशाध्यक्ष तथा राष्ट्रवादीचे प्रदेश कार्यकारणी सदस्य सादिक खाटीक आटपाडी यांनी व्यक्त केली .
Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular