म्हासुर्णे (प्रतिनिधी तुषार माने ) : मा.निखिल दादा शिंदे फांडेशन कराड शहर अध्यक्षपदी धनंजय कुंभार यांची निवड करण्यात आली तर सांस्कृतिक, कला, क्रीडा विभाग अध्यक्षपदी मा.सागर साठे यांची निवड करण्यात आली.
सामाजिक, सांस्कृतिक, कला, क्रिडा क्षेत्रात मा. निखिल शिंदे फांडेशन कार्यरत आहे. सर्वसामान्य युवकांना एकत्रित करून त्यांना चांगले व्यासपीठ उपलब्ध करून समाजातील अपंग, गरजू , तळागातील लोकांच्या गरजा पूर्ण करून त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी कार्यरत आहेत.
फांडेशनचे कार्य पाहून मोठ्या प्रमाणात ‘निखिल शिंदे यांच्या विचारांचा तरुण वर्ग सामाजिक कामासाठी एकत्रित येत आहेत युवकांच्या मागणीनुसार सातारा, सांगली, कोल्हापूर, नवी मुंबई, ठाणे जिल्ह्यातील अनेक इच्छुक वर्ग पदासाठी संस्थेचे सचिव नागेश मुतालिक देसाई यांच्याकडे मागणी करत आहेत. आज नरशार्दूल्य तलवारबाज व दांडपट्टा पथकाचे सागर साठे काले यांची मा.निखिल दादा शिंदे फांडेशनच्या सांस्कृतिक, कला, क्रीडा, विभाग अध्यक्षपदी व शहरातील किंवा शहराच्या आसपास भागचे प्रश्न सोडवण्यासाठी ‘धनंजय कुंभार’ यांची कराड शहर अध्यक्षपदी निवड करण्यात आली.
आपली शिवकालीन कला, वाद्य वादल कला, तलवारबाज, दांडपट्टा कला याचा विद्यार्थी-विध्यार्थीनीं, युवक-युवती यांना फाऊंडेशनच्या माध्यमातून प्रशिक्षण शिबिरे राबवून कला जिवंत ठेवण्याचे आश्वासन सागर साठे यांनी दिले. शहरातील विद्यार्थी-विद्यार्थीनी युवा वर्गांचे प्रश्न फाऊंडेशनच्या माध्यमातून सोडवण्यासाठी व निखिल शिंदे यांचे विचार सर्व युवक युवतीं पर्यंत पोहचवण्यासाठी कार्यरत राहील असे धनंजय कुंभार यांनी मत व्यक्त केले. त्यावेळी नागेश मुतालिक देसाई, मा. डाॅ. योगेश कुंभार, (अध्यक्ष- सदाशिवगड मावळा प्रतिष्ठान) रोहन काळे ऋषभ डुबल, हर्षद कासार, दत्तात्रय निकम , ऋषिकेश तुपे, शुभम चव्हाण, सिद्धनाथ बुधे, रोहित ओव्हाळ, प्रतीक अतकरे, राकेश वडार, प्रतीक केंजळे, नागेश कांबळे, भीमा सर्जे, या युवकांची प्रमुख उपस्थिती होती.