खटाव : भोर तालुक्यातील निरा देवघर धरणाचा उजवा कालवा एकूण 158 किलोमीटरचा आहे. यापैकी कि.मी.26 ते कि.मी.78 या एकूण 52 किलोमीटरचा कालवा ख्।ंडाळा तालुक्यातून जात आहे. ख्।ंडाळा तालुक्यासाठी वापरण्यात येणार पाण्याकरीता,मुख्य कालव्यावर चार मुख्य वितरीका आणि शाखा कालव्यांवर सहा मुख्य वितरीकाव्दारे आणि तीन शासकीय उपसा सिंचन योजना व्दारे ख्।ंडाळा तालुक्यातील 11860 हेक्टर क्ष्।ेत्र ओलीताखाली आणण्यात येणार आहे. यामध्ये कोणी काहीही बदल करु शकणार नाही, खंडाळा तालुक्याला निरा देवघर उजव्या कालव्याच्या पाण्यपासून कोणीही वंचित ठेवू शकणार नाही अशी ठोस माहीती सातारा लोकसभा मतदार संघाचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली आहे.काल लोणंद येथे भेट दिल्यावर निरा देवघर व्यवस्थापनाशी आम्ही जरुर ती चर्चा केली आहे. धरण व्यवस्थापनाला आणि आम्हाला समजेल अश्या पध्दतीने आम्ही सद्यस्थितीची माहीती घेतली आहे असे नमुद करुन, खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी दिलेल्या प्रसिध्दीपत्रकात पुढे नमुद केले आहे की, निरा देवघर या मातीच्या धरणाची एकूण प्रकल्प किंमत सुमारे 3167 कोटी इतकी आहे. पैकी सुमारे 767 कोटी रुपयांची कामे झाली असून, निरा देवघर उजव्या कालव्यामधुन भोर तालुक्यासह सातारा जिल्हयातील खंडाळा, फलटण तालुक्यांना आणि सोलापूर जिल्हयातील माळशिरस तालुक्यांमधील एकूण 43050 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. निरा देवघर धरणाचे काम सन 2008 साली पूर्ण झाले असून, आज रोजी पूर्ण क्षमतेने पाणी अडवण्यात आलेले आहे.निरा देवघर उजवा कालवा पहिल्यांदा 198 किमी. चा होता, तथापि आता तो 158 किमी.चा होणार आहे, पैकी भोरतालुक्यातील कि.मी. 1 ते 25 अखेर तसेच खंडाळा तालुक्यातील कि.मी.26ते 65 अखेर कालव्याचे काम पारंपारिक उघडया पध्दतीने पूर्ण करण्यात आले आहे. अस्तरीकरणाचे काम सुरु आहे. खंडाळा तालुक्यातुन जाणारा 65 कि.मी.च्या पुढील भागाचे काम बंदिस्त नलिकाव्दारे करण्यात येणार आहे. त्याचबरोबर खंडाळा तालुक्याकरीता गावडेवाडी, शेखमीरवाडी आणि वाघोशी उपसा सिंचन योजनो मजूर आहेत. या उपसा सिंचन योजनांचे संकल्पनाचे काम सुरु आहे. गावडेवाडी उपसा सिंचन योजनेमुळे खडाळा तालुक्यातील मिरजे, वडगांव,कवठे,केसुर्डी,अतित,जवळे,असवली,नायगांव या गावांना सिंचनाचा लाभ मिळणार आहे. शेखमिरवाडी उपसा सिंचन योजनेमुळे खंडाळा तालुक्यातील म्हावशी, खंडाळा,धावडवाडी, घाटदरे, अहिरे, बावडा या गावांना लाभ मिळणार आहे. तर वाघोशी उपसा सिंचन योजनेमुहे खंडाळा तालुक्यातील खेड बुद्रूक,सुखेड, पाडळी, निंबोडी, कोपर्डे या गांवाना लाभा मिळणार असून, एकूण उजव्या कालव्याव्दारे खंडाळा तालुक्यातील 49 गावांतील जमिनींना एकूण 3.33 टिएमसी इतके पाणी उपलब्ध होणार आहे. खंडाळा तालुक्यातील जमिनीला निरा देवघर उजव्या कालव्याचे पाणी कोणत्याही परिस्थितीत उपलब्ध होईलच असा आम्हास विश्वास आहे. अनेक वर्षे दुष्काळाची दाहकता सोसणार्या आणि विविध औद्योगिक विश्वाला चालना मिळण्यासाठी त्याग केलेल्या खंडाळा तालुक्यातील ग्रामस्थांना यापुढे निरा देवघर च्या हक्काच्या पाण्यापासून कोणी वंचित ठेवू शकणार नाही,याकरीता आमचे सातत्याने लक्ष राहणार असून, आवश्यकता भासल्यास मोठा संघर्ष उभारु असेही खासदार श्रीमत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी नमुद केले आहे.
निरा देवघर प्रकल्पातून खंडाळा तालुक्यातील 11860 हेक्टर ओलीताखाली आणणार
RELATED ARTICLES