Thursday, April 24, 2025
Homeठळक घडामोडीकासला जाणार्‍या पर्यटकांवर सरसकट कारवाई नको :- आ. शिवेंद्रसिंहराजे ; पोलिसांनी हुल्लडबाजांवर...

कासला जाणार्‍या पर्यटकांवर सरसकट कारवाई नको :- आ. शिवेंद्रसिंहराजे ; पोलिसांनी हुल्लडबाजांवर कारवाई करावी ; गृहमंत्र्यांच्या बैठकीत केली मागणी

सातारा- कास पठार हे जागतिक वारसा स्थळांमध्ये नोंद झालेले पर्यटनस्थळ आहे. कास तलाव आणि कास पठार येथे देशी, पयदेशी पर्यटकांसह स्थानिक लोक नेहमीच भेट देत असतात आणि निसर्गाचा आनंद घेत असतात. मात्र गेल्या काही दिवसांपासून कासला जाणार्‍या पर्यटकांवर पोलीस प्रशासनाकडून सरसकट कारवाई केली जात असून हे चुकीचे आहे. पोलीसांनी सरसकट कारवाई न करता हु‘डबाज, गोंधळ घालणार्‍यांवर कडक कारवाई करावी, समान्य लोकांना त्रास देवू नये, अशी मागणी आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहाजे भोसले यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे केली.
ना. देशमुख हे सातारा जिल्हा दौर्‍यावर आले असताना त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने उद्भवलेली परिस्थिती आणि कायदा व सुव्यवस्थेबाबत आढावा बैठक घेतली. या बैठकीत आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी कास पर्यटकांवर होणार्‍या कारवाईचा मुद्दा उपस्थित केला. यावेळी पालकमंत्री बाळसाहेब पाटील, आ. मकरंद पाटील यांच्यासह सर्व आमदार, जिल्हाधिकारी शेखर सिंह, पोलीस अधिक्षक तेजस्वी सातपुते आदी उपस्थित होते.
कास पठार हे जागतिक पर्यटनस्थळ असून दरवर्षी हजारो पर्यटक या ठिकाणी भेट देत असतात. देशी, परदेशी पर्यटकांसह स्थानिक पर्यटकही मोठ्या सं‘येने या ठिकाणी जात असतात. निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आणि कुटूंबीयांसमवेत विरंगुळा म्हणून शनिवार, रविवार, सुट्टीच्या दिवशी असं‘य सातारकर कासला जात असतात. कोरोनाचे संकट पाहता प्रशासनाच्या निर्बंधांचे प्रत्येकाने पालन करणे बंधनकारक आहेच पण, गेल्या काही दिवसांपासून पोलीस दलाकडून कासला जाणार्‍या पर्यटकांवर सरसकट कारवाईचा बडगा उगारण्यात आला. या पर्यटकांमध्ये लहान मुले, वयोवृध्द आणि महिला यांच्यावरही कारवाई करण्यात आली. पर्यटकांना काठीने मारण्याचा व्हिडीओ सुध्दा व्हायरल झाला. हा प्रकार पुर्णपणे चुकीचा आहे.
कास हे सातारकरांचे आवडते पर्यटनस्थळ आहे आणि ङ्गार पुर्वीपासून सातारकर कास पर्यटनासाठी जातात. त्यामुळे सामान्य पर्यटकांवर कारवाई करणे अयोग्य आहे. हु‘डबाज टोळक्यांवर, मद्य प्राशन करुन धिंगाणा घालणार्‍यांवर आणि बेदरकारपणे वाहने चालवणारांवर तसेच कोरोनासंबंधीचे नियम मोडणारांवर कारवाई झालीच पाहिजे. याबाबत कोणाचेही दुमत नाही. मात्र पोलीस यंत्रणेने सरसकट कारवाई करुन निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी जाणार्‍या पर्यटकांना विनाकारण त्रास देवू नये, अशी मागणी आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी ना. देशमुख यांच्याकडे केली आणि तशा सुचना पोलीस प्रशासनास देण्यास सांगितले. ना. देशमुख यांनीही याबाबत पोलीस प्रशासनाने खबरदारी घ्यावी, अशी सुचना उपस्थित अधिकार्‍यांना केली.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular