Monday, June 23, 2025
Homeताज्या घडामोडीराजभवन येथील त्या ओल्या पार्टीची निवडणूक आयोगाने घेतली दखल

राजभवन येथील त्या ओल्या पार्टीची निवडणूक आयोगाने घेतली दखल

महाबळेश्‍वरः एप्रिलच्या पहील्या आठवडयात लोकसभेची आचार संहीता सुरू असताना सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता व ठेकेदार यांनी राजभवनाच्या विश्रामगृहावर नृत्यांगनासह केलेल्या ओल्या पार्टीची निवडणुक आयोगाने गंभिर दखल घेतली असुन जिल्हा निवडणुक अधिकारी तथा जिल्हाधिकारी यांच्या मार्फत या ओल्या पार्टीची उच्चस्तरीय चौकशी सुरू करण्यात आली आहे दरम्यान शाखाअभियंता राठोड यांचा महाबळेश्‍वर येथील राजभवनाचा कार्यभार काढुन घेतला असल्याची माहीती मिळाली आहे
सार्वजनिक बांधकाम विभाग पुणे अंतर्गत येत असलेल्या व राज्यपाल यांचे निवासस्थान म्हणुन ओळख असलेल्या येथील राजभवन व विश्रामगृहाचा कार्यभार संभाळणारे शाखा अभियंता आणि त्यांच्या मर्जीतील पुणे येथील काही ठेकेदार यांनी याच राजभवनाच्या विश्रामगृहावर सुट क्रमांक 15 मध्ये 3 व 4 एप्रिल रोजी बारबालाच्या पार्टीचे आयोजन केले होते निवडणुकीची आचार संहीता आणि जमाव बंदी आदेशा मुळे विश्रामगृहावर शुकशुकाट असतो या संधीचा फायदा घेण्यासाठी अधिकाराचा गैरवापर करून नृत्यांगणांसह खास ओल्या पार्टीचे आयोजन करण्यात आले होते या पार्टीसाठी कमराबंद डीजे नृत्यांगना नाचविण्यात आल्या होत्या शाखा अभियंता राठोड यांनी आपल्या आयोजित केलेली ही पार्टी वादाच्या भोवरयात अडकली आहे या पार्टीचे वृत्त प्रसिध्द होताच राज्यात एकच खळबळ माजली हे वृत्त थेट राज्यपाल सी विदयासागर राव यांचे पर्यंत पोहचले तर सार्वजनिक विभागाने या पार्टीची चौकशी करण्याचे आदेश दिले सार्वजनिक विभागाचे एक खास पथक महाबळेश्‍वर येथे व चौकशी करून गेले
दरम्यान आचार संहीता लागु असताना सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता यांनी या ओल्या पार्टीचे आयोजन केलेच कसे असा प्रश्‍न निवडणुक आयोगाला पडला असुन त्यांनीही या पार्टीची गंभिर दखल घेवुन स्वतंत्र चौकशी करण्याचे आदेश सातारा जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणुक अधिकारी यांना दिले आहे.
जिल्हाधिकारी यांचे आदेशा नुसार प्रांताधिकारी तथा सहा जिल्हा निवडणुक अधिकारी संगिता चौगुले यांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे त्या साठी त्यांनी राजभवनाला भेट दिली व ज्या सुट मध्ये ही ओली पार्टी झाली त्या सुटची देखिल पाहणी केली तसेच तेथील अधिकारी कर्मचारी यांची चौकशी करून जबाब नोंदविले प्रांताधिकारी यांनी देखिल तेथील सीसीटिव्हि फुटेज तपासले असुन आपला अहवाल तयार केला आहे हा अहवाल लवकरच ते जिल्हाधिकारी यांना सादर करणार आहेत
राजभवनावर ओली पार्टी झाल्याचे काही खास पुरावे सार्वजनिक बांधकाम विभागाचे पथकाच्या हाती लागले असुन ओली पार्टीचे आयोजन करणारे शाखा अभियंता राठोड यांचा महाबळेश्‍वर येथील कार्यभार काढुन घेतला आहे लवकरच राठोड यांचे वर खाते अंर्तगत मोठी कारवाई करण्यात येणार असल्याचे समजते शाखा अभियंता यांच्या या प्रतापमुळे राज्यपाल सी विदयासागर राव यांचा उन्हाळी महाबळेश्‍वर दौरा धोक्यात आला असल्याची चर्चा सातारा जिल्हयात सुरू आहे.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular