Friday, June 20, 2025
Homeठळक घडामोडीडी. जी. कॉलेजमध्ये स्टेट बँक भरती परीक्षेसाठी ऑनलाइन मार्गदर्शन वर्ग

डी. जी. कॉलेजमध्ये स्टेट बँक भरती परीक्षेसाठी ऑनलाइन मार्गदर्शन वर्ग

सातारा :- रयत शिक्षण संस्थेच्या धनंजयराव गाडगीळ वाणिज्य महाविद्यालयातील बँकिंग स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राच्या वतीने 10 मे 2021 पासून स्टेट बँक ऑफ इंडिया ज्युनियर असोसिएट भरती परीक्षेबाबत मार्गदर्शन वर्ग सुरू करण्यात आलेला आहे. एप्रिल 2021 मध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया मधील ज्युनियर असोसिएट भरती परीक्षेची जाहिरात प्रसिद्ध झालेली असून सदर जाहिरातीनुसार 5237 पदांची भरती केली जाणार आहे. यामध्ये विविध प्रवर्गातील पदे भरली जाणार असून सदर भरती परीक्षा जून 2021 मध्ये ऑनलाइन पद्धतीने घेतली जाणार आहे. सातारा जिल्ह्यातील विविध महाविद्यालयातून पदवी प्राप्त केलेले व पदवीच्या शेवटच्या वर्षात असणाऱ्या विद्यार्थ्यांना या परीक्षेबाबत ऑनलाइन मार्गदर्शन करण्याकरिता तज्ञ मार्गदर्शकांची मार्गदर्शनपर व्याख्याने आयोजित केलेली आहेत. या मार्गदर्शन वर्गामध्ये सांख्यिकीय अभियोग्यता, रीजनिंग, इंग्लिश व बँकिंग या विषयाचे मार्गदर्शन केले जाणार आहे. ज्या युवकांना सदर भरती परीक्षा द्यावयाची आहे अशा युवक-युवतींनी महाविद्यालयातील ऑनलाईन मार्गदर्शन वर्गासाठी दिनांक 15 मे 2021 अखेर आपला प्रवेश निश्चित करावा असे आवाहन केंद्र समन्वयक डॉ. विजय कुंभार, उपप्राचार्य प्रा. डॉ. विठ्ठल सावंत व महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. प्रतिभा गायकवाड यांनी केले आहे. अधिक माहिती करिता 02162-234729 व 9860176059 या नंबर वर संपर्क करावा, ऑनलाईन मार्गदर्शन वर्गाच्या प्रवेशाकरिता http://dgcc.rayatdc.com/DGCC/ या वेबसाईटवर अर्ज सादर करावा.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular