सातारा : सातारा शहरातील सदाशिव पेठेतील पंचमुखी मंदिरासमोरील नव्याने साकारलेल्या हॉटेल चंद्रविलास भुवन या वास्तुचे उद्घाटन माजी नगराध्यक्ष श्री.छ.शिवाजीराजे भोसले यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले.
या कार्यक्रमास माजी उपनगराध्यक्ष प्रकाश गवळी, ज्येष्ठ चित्रपट निर्माते डॉ. अरूण गोडबोले, उद्योजक इब्राहिम (बाबा शेठ) तांबोळी, नगरसेवक किशोर शिंदे, ज्येष्ठ उद्योजक अनिल काटदरे, नगरसेविका सुनिता खुंटाळे, ज्येष्ठ उद्योजक विजय जोशी, नगराध्यक्षा माधवी कदम, तसेच मोठ्या संख्येने नागरिक, हितचिंतक उपस्थित होते. यावेळी हॉटेल चंद्रविलासचे मालक वसंत जोशी म्हणाले सातारकरांच्या सेवेमध्ये हॉटेल चंद्रविलास भुवन सोमवारपासून सज्ज राहणार आहे.
याप्रसंगी मान्यवरांचे स्वागत पुष्पगुच्द देवून वसंत जोशी, इंदुमती जोशी, प्रविण जोशी, प्रफुल्ल जोशी यांनी केले.