Saturday, June 21, 2025
Homeठळक घडामोडीखा.श्री. छ. उदयनराजेंच्या हस्ते होणार खासदार करंडक व्हॉलिबॉल स्पर्धेचे उद्घाटन

खा.श्री. छ. उदयनराजेंच्या हस्ते होणार खासदार करंडक व्हॉलिबॉल स्पर्धेचे उद्घाटन

सातारा: महाराष्ट्र राज्य व्हॉलिबॉल संघटनेच्या मान्यतेने सातारा जिल्हा व्हॉलिबॉल संघटना आणि सातारा पालिकेच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुलात 20 वी महाराष्ट्र राज्य युथ (मुले व मुली) अजिंक्यपद खासदार करंडक व्हॉलिबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. दिवस-रात्र खेळविण्यात येणार्‍या या स्पर्धेतून राष्ट्रीय स्पर्धेसाठी राज्याचा व्हॉलिबॉल संघ निवडला जाणार असल्याची माहिती संयोजकांनी दिली.
सातारा जिल्हा व्हॉलिबॉल संघटनेची स्थापना 1982 मध्ये झाली. आजपर्यंत संघटनेने जिल्ह्यातील विविध भागात चार राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन केले होते. जिल्ह्यातील प्रज्ञा वरेकर हिने आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत तसेच विविध वयोगटात 151 खेळाडूंनी राष्ट्रीय स्तरावर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व केले आहे. 2015 मध्ये जिल्ह्याच्या महिला संघाने राज्य स्पर्धेत तृतीय स्थान मिळविले आहे. ग्रामीण व शहरी भागातील खेळाडूंना प्रोत्साहन व ऊर्जा मिळावी यासाठी यंदाची स्पर्धा सातारा शहरात प्रथमच होत आहे. सातारा पालिकेच्या सहकार्याने होणार्‍या स्पर्धेचे उद्घाटन शनिवारी (ता. 23) सायंकाळी सहा वाजता खासदार उदयनराजे भोसले यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत होईल. स्पर्धेत कोल्हापूर, मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती, नागपूर आणि लातूर या आठ विभागातील मुलांचे व मुलींचे संघ सहभागी होणार आहेत.
खेळाडू, मार्गदर्शक व सहायक, पंच आदी एकूण 350 जणांची निवास व भोजन व्यवस्था क्रीडा संकुलात करण्यात आली आहे. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सातारा पालिका, जिल्हा व्हॉलिबॉल संघटना, जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय यांच्यासह क्रीडाप्रेमींचे योगदान लाभत आहे.
नामवंतांचा खेळ पाहण्याची संधी 
प्रकाशझोतात आज स्पर्धेच्या साखळी सामन्यांना प्रारंभ झाला आहे. त्यापुर्वी उपनगराध्यक्ष राजू भोसले, नगरसेविका सुजाता राजेमहाडीक, नगरसेविका धनश्री महाडीक, माजी नगरसेवक कल्याण राक्षे, राम कदम, प्रा. बाळासाहेब सूर्यवंशी, प्रा. जितेंद्र गुजर, इर्शाद बागवान आदी उपस्थित होते. या स्पर्धेत राज्यातील आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय खेळाडू सहभागी होणार आहेत. या खेळाडूंचा सातारकरांना खेळ पाहता यावा, यासाठी प्रेक्षा गॅलरीची व्यवस्था करण्यात आली आहे. या स्पर्धेचा जास्तीत जास्त क्रीडाप्रेमींनी आनंद घ्यावा, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.
Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular