मायणी :- (सतीश डोंगरे) खटाव तालुक्याचे नेते सातारा जिल्हा परिषद तसेच जिल्हा नियोजन समितीचे सदस्य,मायणी अर्बन बँकेचे चेअरमन सुरेंद्र गुदगे व त्यांचे कट्टर समर्थक व मायणी ग्रामपंचायत विरोधी गटनेते रणजित माने यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सुरेंद्रदादा गुदगे युथ क्लब मायणी यांच्या वतीने सोमवार दि २८ मे रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आल्याची माहिती मायणी भाग शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक बाळासाहेब जाधव यांनी दिली.
हा भव्यदिव्य रक्तदान शिबिर सोहळा श्री सिद्धनाथ मंदिर मायणी येथे पार पडणार असून या रक्तदान शिबिरासाठी सिद्धिविनायक कॅन्सर हॉस्पिटल ब्लड बँक मिरज यांचे सहकार्य मिळणार आहे. रक्तदान शिबिरासाठी रक्तदात्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
जि प सदस्य सुरेंद्र गुदगे यांच्या वाढदिवसानिमित्त २८ मे रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन
RELATED ARTICLES