सातारा :- पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर सातारा शहरानजीक ऑक्सिजन टँकरला गळती लागली ,यामुळे परिसरात खळबळ उडाली असून ते लिकेज थांबवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्यात आले. दरम्यान घटनास्थळी सातारा पोलिसांनी धाव घेतली .
बुधवारी दिनांक पाच रोजी सायंकाळी सहा वाजता कोल्हापूरच्या दिशेने निघालेला ऑक्सिजनचा टँकर अचानक थांबला यावेळी टँकरमधून मोठ्या प्रमाणात आवाज येऊ लागल्याने ड्रायव्हर घाबरला. त्याने खाली उतरून पाहिले असता ट्रेकच्या पाठीमागून मोठ्याप्रमाणात ऑक्सीजन गळती सुरू झाली होती. सदर ऑक्सिजन गळती ही टँकर मध्ये क्षमतेपेक्षा जास्त ऑक्सिजन भरल्यामुळे झाली असावी असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे .