उन्हाच्या कडाक्यात पाणी, धान्याची सोय
म्हसवड (विजय भागवत) : पक्षाची पाण्याची धडपड पाहून माण तालुक्यातील खुद्द गोंदवले येथील रोहित आणि रक्षीता या दोन्ही बहीण -भाऊंनी दुष्काळात पक्षासाठी माळावर पाणीचे कुंड तयार केले आहेत .घरातील उरलेले अन्न सावलीतपक्षासाठी ठेवत आहेत.परिसरातील पाणवठे आटत चाललेले असतात फेब्रुवारी महिन्यात पक्षांना खाण्यासाठीही काही मिळत नाहीत. त्याबरोबरच पक्ष्यांच्या खाण्याची व्यवस्थाही केली आहे. पण ती सर्वांसाठी पुरेशी ठरणारी आहे.
दुष्काळामुळे पाणी आणि अन्नासाठी पक्ष्यांना मदत करण्याची गरज आहे. उन्हाळ्यात पक्ष्यांसाठी पाणी, अन्न आणि निवार्याची व्यवस्था करणे गरजचे आहे.
पाण्यासाठी सध्या पक्षाची धडपड सुरू आहे. किमान गरजेपुरते पाणी मिळावे यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नातून पक्ष्यांनाही मदत होईल असे काम हे बहीण -भाउ करत आहे. आपल्या घराच्या अवतीभोवती, परिसरात पक्ष्यांसाठी छोटी घरटी तयार करणे किंवा त्यांना निवारा तयार करून देणे गरजेचे आहे. अनेक पक्षीमित्रांनी जंगलात जाऊन पाणवठे तयार केले आहेत. चिमणी आणि बुलबुल यांच्याशिवाय अन्य पक्षांचेही आवाज ऐकू येऊ लागलेत. दुष्काळी भागातून पक्षी आपल्याकडे येत आहेत. त्यांना अधिकाधिक सुविधा कशा उपलब्ध होतील या दृष्टीने ही मदत महत्वाची ठरेल.
विविध प्रजातीची हरणे, माकडे, आदी वन्यप्राण्यांसह मोर, कबूतरे, चिमणी, कावळे मैना, पोपट, तितर, सर्पगरुड, गिधाड यांसारखे असंख्य पक्षी ठीकाणी पाण्यासाठी येत आहे. सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने या सर्व वन्यजीवांना पाण्याची मोठ्या प्रमाणावर गरज भासत आहे. नागरी वस्तीकडे येणारे बहूतांश प्राणी, पक्षी पाणी आणि अन्नाच्या शोधातच येतात. त्यामुळे त्यांना ते जंगलाच्या परिसरातच उपलब्ध झाले तर त्यांचे नागरी वस्तीकडे येणारे प्रमाण कमी होईल. जंगलांसह नागरी वस्तीत काय नागरिकांना अनेक गोष्टी करता येतील.
माझे घर, बाग, रस्ता ऑफिस, सार्वजनिक ठिकाणी, बागेत एखादी कुंडी, पाण्यासाठी एखादे पसरट भांडे ठेवले, तसेच उरलेले अन्न ठेवले तर आपल्या घराजवळ बगीच्याकडे येणार्या पक्षाची संख्या मोठ्या प्रमाणात वाढेल. यामध्ये पाण्याचे कुंड, पसरट भांडे उंचावर, थोडे सावलीत ठेवावे. त्याठिकाणीच अन्न, कण्या, धान्य न ठेवता ते बाजूला ठेवावे, जेणेकरून मुंग्या लागणार नाहीत.
घराच्या सावलीत पाण्याने भरलेले भांडे ठेवावे.शक्य झाल्यास त्या शेजारी धान्य टाकावे. पक्षांसाठी घरातील उरलेले अन्न सावलीत ठेवावे. पक्षांसाठी सावली करून त्यात पाणी ठेवावे. झाडांवरही पाण्याने भरलेले भांडे ठेवावे.
पक्षीमित्र रोहित बनसोडे
दहिवडी काँलेज विध्यार्थी
पक्षीमित्र रोहित व रक्षीताचा संघर्ष मुक्या जिवांच्या तहानेसाठी …
RELATED ARTICLES