सातारा : लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सेना भाजपने यश संपादन केले असले तरी, सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री तथा जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्या पुणे जिल्ह्यातील पुरंदर मतदार संघातून प्रतिनिधित्व करीत आहेत. तर सातारचे पालकमंत्री आहेत. या दोन्ही ठिकाणी सेना भाजपचे उमेदवार पराभूत झालेले आहेत. याची खंत त्यांनी प्रसार माध्यमांसमोर उपस्थित केलेल्या प्रश्नाला व्यक्त केली आहे. काम न करणार्याना निवडुण देणे हे लोकशाहीला धोका आहे. यामुळेच समाजाचे नुकसान होते, असा निष्कर्ष त्यांनी काढला. सातार्यातील वैद्यकीय महाविद्यालय लवकर सुरू होईल, असा ही त्यांनी आशावाद मांडला.
सातारा जिल्हा नियोजन भवनात पाणी टंचाईबाबत बैठक संपन्न झाल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी दिलखुलास उत्तरे दिली. माण-खटाव या दुष्काळी भागात पिण्याचे पाणी उपलब्ध करण्यास प्राधान्य दिले आहे. टेंभुच्या योजनेतून कायमस्वरूपी दुष्काळ नाहिसा व्हावा यासाठी प्रयत्न सुरू केला आहे. पण सध्या पाणी उपलब्ध होत असल्यामुळे काहीजण शेतीसाठी त्याचा वापर करीत आहेत. पाण्याचा पिण्यासाठीच वापर व्हावा अशा सक्त सुचना केल्या आहेत. 2005 पासून दुष्काळी भागात पिक लागवडीबाबत माहिती घेत असून शेतकर्यांनी सुद्धा मायक्रो सिंचन केले पाहिजे. जनावरे व माणस जगवणे याला प्राधान्य दिले आहे. औद्योगिकरण वाढले तरच नोकर्या उपलब्ध होणार आहे. जिल्ह्यातील पाणी योजना कार्यान्वीत करण्यासाठी शिवसेनेचे आंदोलकांवरही गुन्हे दाखल केले आहेत. वैयक्तिक गावात पाणी सोडणे अशक्य असून दि. 15 जुलै पर्यंत पिण्याचे पाणी आरक्षित करावे लागणार आहेत. पाऊस पडून धरणे भरल्यानंतर प्रत्येक गावात पाणी पुरविणे शक्य होणार आहे. ज्या गावांना पिण्याच्या पाणी टँकरचीच अवश्यकता आहे त्याठिकाणी तीन दिवसाता टँकरला मंजुरी द्यावी. सध्या सातारा जिल्ह्यात 61 चारा छावण्या सुरू असून ज्या संस्था चारा छावण्या चालवित आहेत. त्यांना पाणी पुरवठा करण्याची जबाबदारी शासनाने घेतलेली आहे. पाण्याची ऑडिट कालवा समितीत होत असते त्यामुळे कोणी पाणी पळवते यावर कोणी विश्वास ठेवू नये. राष्ट्रवादी विजयी झाली असली तरी, राष्ट्रवादीचा विचार मतदारांनी नाकारल्याचे स्पष्ट झाले आहे. माढाचे शिवसेनेचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी अधिकारी भ्रष्टाचार करत असेल तर त्याला मारा, असे सांगितले. याबाबत प्रतिक्रिया देताना मंत्री शिवतारे म्हणाले, भ्रष्टाचार होवू नये ही त्या मागची भूमिका आहे. पण चप्पलने मारणे असे सांगणे योग्य नाही, असेही स्पष्ट केले.
भाजप नेते व उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक यांचा पराभव करून अभिनेता गोविंदा निवडुण आला होता, अशा अनेक घटना घडतात. त्यामुळे त्या मतदार संघातील समाजाचे नुकसान होते. असा दाखला देवून त्यांनी सांगितले, काहीजण चार वर्षे गप्प बसतात व निवडणुकीच्या काळात स्टंटबाजी करतात. लोकांच्याबद्दल आपल्याला काळजी आहे हे दाखवतात, हा त्यांचा पब्लिक स्टंट आहे. गैरप्रकार होत असतील तर त्यांनी लेखी निवेदन द्यावे असा शासनाने आदेश काढला आहे असे ही त्यांनी स्पष्ट केले.
सातार्यात लाचलुचप्त व वाळू माङ्गियांबाबत पोलिस कारवाईनंतर त्यांना शासकीय रूग्णालयात दाखल केले जाते, ही बाब गंभीर असून सिव्हिल सर्जनने जे प्रमाणपत्र दिले आहे. त्याची त्रयस्त वैद्यकिय अधिकार्यांमार्ङ्गत तपासणी करावी, अशीही सुचना सातारचे जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांना देण्यात आली. या पत्रकार परिषदेच्यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे, हारणाई सुत गिरणीचे रणजितसिंह देशमुख, एकनाथ ओंबळे व काही काळानंतर राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे उपस्थित होते.
काम न करणार्याना निवडुण देणे लोकशाहीला धोका आहे:पालकमंत्री शिवतारे
RELATED ARTICLES