सातारा :- सातारा,येथील प्रथितयश शास्त्रीय गायिका डॉ.सौ.संगीता सतीश कोल्हापुरे यांना पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर संगीत रत्न पुरस्कार जाहीर झाला आहे.
पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर यांच्या 150 व्या जयंती निमित्त अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाच्या वतीने शास्त्रीय संगीताचा प्रसार आणि प्रचार करण्याबरोबर गायन क्षेत्रात अमूल्य योगदान दिल्याबद्दल या पुरस्काराने त्यांना गौरविण्यात येणार आहे.19 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता वाशी,मुंबई येथे हा पुरस्कार प्रदान सोहळा संपन्न होणार आहे.
सौ.संगीता कोल्हापुरे यांनी भेंडी बझार घराण्याच्या बुजुर्ग गायक,गुरूंकडून शास्त्रीय संगीताची तालीम घेतली.बडोदा येथील महाराजा सयाजीराव विद्यापीठ येथे 1967 सा ली संगीत विषय घेऊन बी. ए.पदवी घेतली. एस.एन. डी. टी.महिला विद्यापीठ,मुंबई येथे1984 साळी एम. ए.पदवी प्राप्त केली.1993 मध्ये गांधर्व महाविद्यालयाची संगीता चार्य ..पीएचडी ही पदवी प्राप्त केली.त्यांनी सातारा येथे सूर वर्धीनी संस्थेची स्थापना करून अनेक शिष्य तयार केले.गेली सहा दशके त्या संगीत साधना करत असून त्यांनी दूरदर्शन,आकाश वाणीवर स्वर धारा,सुगम संगीत तसेच राम रंगी रंगले, वाणी स्त्री संतांची हे कार्यक्रम सादर केले.सामाजिक उपक्रमात सहभाग घेतला.
डॉ.संगीता कोल्हापुरे यांना पलुस्कर संगीत रत्न पुरस्कार जाहीर
RELATED ARTICLES