कोरेगावः पाणी फौंडेशनला शासकिय कार्यालये व अधिकारी वर्ग यांचे व्यक्तिगत सहकार्य लाभावे यासाठी पाणी वाचवा देश वाचवा आणि पाणी फौंडेशनला सहकार्य करा असे कोरेगांव शहर विकास मंचचे अध्यक्ष किशोर बर्गे यांचे वतीने आवाहन करण्यात आले. या आवाहनाचे प्रांत अधिकारी सौ. किर्ती नलावडे मॅडम व इतर कार्यालयीन अधिकारी वर्गाने उस्फुर्त स्वागत केले. यावेळी मंचचे वतीने पाणी फौंडेशनचे पाणी वाचवा देश वाचवाचे फलक प्रांत कार्यालयात दर्शनी भागात बांधण्यात आले.
यावेळी किशोर बर्गे आवाहन करताना म्हणाले, मंचचे वतीने पाणी फौंडेशनचे काम हाती घेण्यात आले असून पाणी वाचवा देश वाचवा ही संकल्पना मांडण्यात आली आहे. हा विचार व विषय सर्व जनतेपर्यंत पोहोचावा या उद्देशास शासकिय कार्यालये व अधिकारी यांचे माध्यमातून बळ मिळावे व त्यांचेही सहकार्य लाभावे या अपेक्षेने मंचचे वतीने पाणी फौंडेशनचे पाणी वाचवा देश वाचवाचे फलक प्रांत कार्यालयात लावलेले आहेत.
प्रांत अधिकारी सौ. किर्ती नलावडे मॅडम यांनी किशोर बर्गे यांचे कार्याचे स्वागत करून पाण्याचे महत्व विशद केले त्या म्हणाल्या, पाण्याचे दुर्भीक्ष वाढत चालले आहे. पाण्याचे काटकसरीने नियोजन करणे गरजेचे आहे. तसेच पाणी साठविणे विविध उपक्रमांतून सहज शक्य आहे. पाण्याची उपलब्धता देशास समृध्द करू शकतो. पाणी फौंडेशनला शासनाचे सर्वतोपरी सहकार्य राहील तसेच व्यक्तिगत रित्याही सर्वजण यात सहभागी होवून काम करतील अशी ग्वाही देते.
या कार्यक्रमास काळे साहेब, इतर प्रांत अधिकारी वर्ग, कार्याध्यक्ष दिलीपराव बर्गे, विनोद गोरे व नागरिक उपस्थित होते.
पाणी फौंडेशनला शासनाचे सर्वतोपरी सहकार्य राहील : सौ. किर्ती नलावडे
RELATED ARTICLES